पुणे शहर

पुण्यासाठी मोठी बातमी दुकाने ८ वाजेपर्यंत तर हॉटेलला रात्री दहा वाजेपर्यंत परवानगी

पुणे : सोमवार ते शुक्रवार पुणे शहरातील दुकाने सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. तर हॉटेल,रेस्टॉरंट रात्री दहा वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. पण रूग्ण संख्या वाढली तर ताबडतोब निर्णय रद्द होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

पुणे शहरात शनिवार आणि रविवार दुपारी चार वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे.पुण्यातील निर्बंधासंदर्भात अजित पवार यांची बैठक पार पडल या बैठकीत पुण्यातील दुकाने संध्याकाळी 8 पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आज अजित पवार पुण्यातील निर्बंध शिथिल करण्याची घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार पुण्यातील दुकाने रात्री 8 वाजेपर्यंत उघडी राहू शकतात.  पुण्यातील निर्बंध शिथील केल्याने सोमवारपासून पुणेकरांसाठी निर्बंधाची नवी नियमावली लागू झाली आहे.

पुण्यात काय सुरु काय बंद?

  • पुण्यातील सर्व दुकानं सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 वाजेपासून रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहणार
  •  हॉटेल्स सोमवार ते शुक्रवार रात्री 10 पर्यंत सुरू राहणार
  • पुण्यात मॉल्सही रात्री 8 पर्यंत सुरू, लशीचे 2 डोस घेतलेल्यांना प्रवेश 
  • जलतरण तलाव वगळून इतर इनडोअर आणि आऊटडोअर क्रीडा प्रकार सुरु राहतील.
  •  शनिवार रविवार सर्व सेवांना दुपारी 4 पर्यंत परवानगी
  • शहरातील सर्व उद्याने नियमित वेळेनुसार सुरू राहणार
  • पुणेकरांना मास्क लावणे बंधनकारक आहे

पुण्यात उद्यापासून निर्बंध शिथिल महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली सविस्तर माहिती….

Img 20210727 wa0218

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये