पुणे शहर

रक्तदान महायज्ञ करून समाजापुढे ठेवला आदर्श

पुणे : विश्व हिंदू परिषद , बजरंग दल सिंहगड भागातर्फे रक्तदान शिबिरासारखे महत्वपुर्ण समाजउपयोगी उपक्रम कोरोना सारख्या आपत्तीजन्य परिस्थितीत रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा असताना घेतला गेला.एकूण १४ ठिकाणी पार पडलेल्या या रक्तदान महायज्ञात ११११ रक्तदान झाले.

या उपक्रमात सिंहगड रोड वरील अनेक गणेश मंडळे , सामाजिक संस्था,गृहरचना संस्था यांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.अनेक तरुण तरुणी तसेच महिलांचा सहभाग हा उल्लेखनीय होता

आलेल्या प्रत्येक रक्तदात्यास प्रशस्ती पत्रक आणि स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या शिबिरास पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ तसेच उपमहापौर सरस्वती शेंडगे आणि आमदार भीमराव  तापकीर,बजरंग दल प्रांत संयोजक लहुजी धोत्रे, वि. हि. प चे किशोर चव्हाण,तुषार कुलकर्णी संघाचे भाग कार्यवाह मंगेश पाटील,रोटरी क्लबचे अभय जोशी,भोई प्रतिष्ठानचे डॉ.मिलिंद भोई तसेच स्थानिक नगरसेवक आणि विविध राजकीय पक्षातील मान्यवर व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.महापौर,उपमहापौर यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.या महायज्ञासाठी सिंहगड रोड वरील 300 तरुण अहोरात्र परिश्रम घेत होते

Img 20201210 wa0001
Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 13 pm

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये