पुणे शहर

येणाऱ्या काळात युवकांची मोठी फळी पुणे शहरात राष्ट्रवादी युवकच्या माध्यमातून उभी राहील : किशोर कांबळे

पदाधिकारी नीवडीच्या मुलाखतींना सुरुवात..

पुणे : युवकांमध्ये राजकारणात येण्याची जी इच्छा आहे ते पाहून आनंद होतो आहे. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, समाजाप्रती काहीतरी केले पाहिजे या भावनेतुन आज युवक पुढे येत आहे. येणाऱ्या काळात युवकांची मोठी फळी पुणे शहरात राष्ट्रवादी युवकच्या माध्यमातून उभी राहील असा विश्वास राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कांबळे यांनी व्यक्त केला आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर सर्व कार्यकारणी व मतदार संघाचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष यांच्या मुलाखतीचा पहिला टप्पा पार पडला यात शिवाजीनगर, वडगावशेरी, शिरूर -हवेली, पर्वती, हडपसर, पुरंदर-हवेली  या मतदार संघाच्या शहर व मतदार संघ च्या पदांसाठी इच्छूक कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखतींना युवकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.
               

या मुलाखती पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कांबळे, युवकचे निरीक्षक विशाल काळभोर, प्रदेश उपाध्यक्ष अभिषेक बोके, राकेश कामठे, कार्याध्यक्ष मनोज पाचपुते, अजिंक्य पालकर,समन्वयक समितीचे सदस्य अब्दुल हाफीज आणि मारुती आवरगंड यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये घेण्यात आल्या.

Img 20220118 wa0213

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये