पुणे शहर

पुण्यात जागतिक अंमली पदार्थ विरोधी सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांशी संवाद

येरवड्यात समुपदेशकांसह पोलीस अधिकाऱ्यांचा अभिनव उपक्रम

पुणे : जागतिक अंमली पदार्थ विरोधी सप्ताहानिमित्त जनजागृती मोहिमेअंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद कार्यक्रम येरवडा पोलीस स्टेशन येथे आयोजित करण्यात आला होता. पोलीस उपआयुक्त रजनीकांत चिलूमुला यांच्या संकल्पनेतून परिमंडळाच्या विभागातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये व्यसनविरोधी विचारांवर विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती व प्रबोधन सुरू करण्यात आलेले आहे.

Img 20260628 wa00154047640169034193333


या कार्यक्रमात गेनबा सोपानराव मोझे उच्च माध्यमिक प्रशालेच्या इयत्ता बारावीतील 120 विद्यार्थी व 10 शिक्षक सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांचे दुष्परिणाम, व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व, कायदेशीर बाबी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमात मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे समुपदेशक शुभम मर्चंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, पोलीस निरीक्षक (गुन्हे) नीलकंठ जगताप, निर्भय विद्यार्थी अभियानाचे संस्थापक निखिल गायकवाड व पौर्णिमा गादिया यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केले.

Img 20260628 wa0016378915985835713852

सहाय्यक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग सुनील जैतापुरकर यांनी विद्यार्थ्यांचे समुपदेशन करून व्यसनमुक्त समाज घडविण्याचे आवाहन केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात झाला. पोलीस निरीक्षक केशव दिंडे यांनी आभार मानले.

Fb img 17803875442192531368419001118856

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये