महापालिकेने जागा दिलेल्या क्रश्ना लॅबकडून जास्त दर आकरून तपासण्या ; नगरसेविका अल्पना वरपे यांचा आरोप

पुणे : pune city पुणे महानगरपालिकेतर्फे सेवक, शहरी गरीब योजनाधारक तसेच सर्वसामान्य नागरिकांना विविध प्रकारच्या रक्त चाचण्या, एक्स-रे, एम आर आय, सिटी स्कॅन, सोनोग्राफी इ. तपासण्या अत्यल्प दारात करण्याकरिता पुणे मनपातर्फे क्रश्ना डायग्नोस्टिक सेंटर सोबत करार करण्यात आला आहे. त्यानुसार पुणे मनपाच्या विविध हॉस्पिटल व दवाखाने या ठिकाणी क्रश्ना डायग्नोस्टिक सेंटरला जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र या क्रश्ना डायग्नोस्टिक सेंटर मध्ये करण्यात येणाऱ्या तपासण्या या खाजगी लॅब पेक्षा जास्त दराने करण्यात येत असल्याचा आरोप नगरसेविका अल्पना वरपे यांनी केला आहे.
क्रश्नाया चुकीच्या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांना योग्य त्या सूचना देण्याची मागणी अल्पना वरपे यांनी निवेदनाद्वारे महापालिका आयुक्तांना केली आहे. वरपे यांनी म्हंटले आहे की रक्त चाचण्या, एक्स-रे, एम आर आय, सिटी स्कॅन, सो आयनोग्राफी या तपासण्या करिता खाजगी लॅब पेक्षा क्रश्ना लॅबकडून जास्त दराने आकारणी करण्यात येत असल्याचे दिसून येत असून खाजगी लॅब व क्रश्ना लॅब मधील रिपोर्टमध्ये सुद्धा तफावत असल्याचे निदर्शनास आले आहे.

सदर बाब हि अत्यंत गंभीर स्वरुपाची असून पुणेकर नागरिकांच्या आरोग्यासोबत खेळण्याचा जीवघेणा प्रकार सुरु आहे. या बाबत कै. जयाबाई सुतार प्रसूतीगृह कोथरुड येथील क्रश्ना डायग्नोस्टिक सेंटर बाबत व तेथील कर्मचाऱ्यांच्या वर्तणूकी बाबत तक्रारी आमच्या कार्यालयात करण्यात आल्या आहेत. व त्या तक्रारी वेळोवेळी सहाय्यक आरोग्य अधिकारी यांचे निदर्शनास आणून दिल्या आहेत. परंतु या मध्ये पुढे कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याचे वरपे यांनी सांगितले आहे.
पुणे मनपाचे कर्मचारी यांचे वेतनातून दरमहा अंशदायी वैदयकीय सहाय्य निधीसाठी कपात करण्यात येते. व त्या बदल्यात कर्मचाऱ्याच्या वैद्यकीय तपासणी व औषधोपचारचा एकूण खर्चा पैकी ९०% खर्च हा पुणे मनपातर्फे अदा करण्यात येतो. नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकी मध्ये सदर खर्च हा १००% करण्यात यावा या बाबत ठराव मंजूर करण्यात आला आहे. परंतु सदर लॅबमध्ये मनपा कर्मचारी तपासणी करण्याकरिता गेले असता त्यांच्या कडून जास्त रकमेची मागणी करण्यात येते. साधारण ज्या सोनोग्राफी करण्याकरिता खाजगी लॅब मध्ये ५०० रुपये इतका खर्च येतो. तिच सोनोग्राफी क्रश्ना डायग्नोस्टिक सेंटर येथे करण्याकरिता ६१५ रु.
आकारण्यात येतात. तसेच एम आर आय व सिटी स्कॅन करण्या करता देखील जास्त रक्कम घेण्यात येते असल्याचेआमच्या निदर्शनास आले आली असल्याचे वरपे यांनी म्हंटले आहे.



नागरिकांना व पालिका कर्मचाऱ्यांना माफक दरात तपासण्या करण्यात याव्यात म्हणून या लॅब ला महापालिकेकडून जागा देण्यात आली आहे मात्र तसे होताना दिसत नसून लॅब चालक फक्त स्वतःचा फायदा करून घेत असल्याचे वरपे यांनी म्हंटले आहे.
हा सुरू असलेला प्रकार अत्यंत गंभीर स्वरुपाचा असून आपण या बाबत महापालिका आयुक्तांनी वैयक्तिक लक्ष देऊनसंबंधित लॅबला सूचना द्याव्यात व पुणे मनपा सोबत करण्यात आलेल्या कराराची प्रत व विविध तपसण्या करण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या दराबाबत सेंटरच्या आवारा मध्ये दर्शनीय भागामध्ये फलक लावण्यात यावा. जेणे करून सर्व सामान्य नागरिकांची होणारी फसवणूक थांबेल अशी मागणी अल्पना वरपे यांनी केली आहे.



