महाराष्ट्र

किरण साळी यांची युवासेनेच्या महाराष्ट्र राज्याच्या सहसचिव पदी निवड

पुणे : शिवसेना पुणे शहराचे उपप्रमुख किरण साळी यांची युवासेनेच्या महाराष्ट्र राज्याच्या सहसचिव पदावर निवड करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना प्रमुख, राज्याचे पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे आणि युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी ही निवड जाहीर केली आहे.

आमचे दैवत, शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरेसाहेब यांच्या विचाराने आजवर केलेल्या वाटचालीचे हे फळ आहे. हा बाळासाहेबांचाच आशिर्वाद आहे. पक्षश्रेष्ठींनी युवासेनेच्या विस्तारासाठी दिलेली ही जबाबदारी आव्हानात्मक आणि मोठी आहे. युवासेनेचे सर्व पदाधिकारी, सहकारी, शिवसैनिकांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाखाली ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडू, असा विश्वास किरण साळी यांनी व्यक्त केला आहे.

किरण साळी विद्यार्थीदशेपासूनच शिवसेनेत सक्रिय आहेत. पुणे शहरातील एका महाविद्यालयाच्या भारतीय विद्यार्थी सेनेचे शाखा प्रमुख म्हणून त्यांनी आपल्या कामाची सुरुवात केली. विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडत असतानाच त्यांची धडाडी पाहून त्यांची पुणे शहर विद्यार्थी सेनेचे उपाध्याक्ष, युवासेना कार्यकारिणी प्रमुख, पुणे शहर युवासेनेचे पहिले अध्यक्ष,  शिवसेनेचे शहर समन्वयक या पदावर त्यांनी काम केले. आता ते पुणे शहर उपप्रमुख पदावर ते कार्यरत होते. त्यांच्या कामाची आणि युवासेनेच्या बांधणीची दखल घेऊन त्यांची युवासेनेचे राज्याचे सहसचिव या पदावर निवड करण्यात आली आहे. शिवसेनेचे संघटन मजबूत करणारा आणि सामान्यांना शिवसेनेशी जोडणारा तरुण, धडाडीचा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. हीच ओळख भविष्यात अधिक गडद व्हावी, अशी अपेक्षा पक्षश्रेष्ठींनी व्यक्त करून त्यांनी पुढील कामांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Img 20210522 wa0207

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये