उशीरा एबी फॉर्म, उमेदवारांची धावपळ; कोथरूडमध्ये हे उमेदवार निवडणुकीच्या मैदानात

पुणे : पुणे महानगर पालिका निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सर्वच पक्षांच्या उमेदवारांची धावपळ उडाली आहे. पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर न करता अखेरच्या क्षणी एबी फॉर्म दिला गेल्याने उमेदवारांची मोठीं धावपळ उडाली.
कोथरूड मधील मयूर कॉलनी- डहाणूकर प्रभागातून ऐनवेळी माजी नगरसेविका हर्षाली माथवड यांची उमेदवारी कापून भाजपाचे जुने कार्यकर्ते जगन्नाथ कुलकर्णी यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली. तर भाजपचे मंडल अध्यक्ष निलेश कोंढाळकर यांची उमेदवारी कापण्यात येऊन हर्षाली माथवड यांचे पती दिनेश माथवड यांना उमेदवारी देण्यात आली.

भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांची युती तुटल्यामुळे कोथरूड मधील अनेक ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांना एबी फॉर्म दिले गेले. त्यामूळे अनेक ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांचे पॅनल हि निवडणुकीच्या रिंगणात आले आहे.
कोथरूड मधील मयूर कॉलनी – डहाणूकर कॉलनी प्रभागातून महा विकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांच्या वतीने तगडे पॅनल तयार करण्यात आहे. शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक योगेश मोकाटे, मनसेचे माजी नगरसेवक किशोर शिंदे आणि दोन महिला उमेदवार भाजपच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.
प्रभाग क्रमांक 10 बावधन भुसारी कॉलनी
भाजप – अ- किरण दगडे पाटील, क -अल्पना गणेश वरपे, ब-रुपाली सचिन पवार, ड -दिलीप वेडे पाटील
राष्ट्रवादी काँग्रेस – अ- अभिजीत राजेंद्र दगडे, ब -जयश्री गजानन मारणे, क – सुजाता सूर्यकांत भुंडे, ड-शंकर दत्तात्रय केमसे
प्रभाग क्रमांक 11 रामबाग कॉलनी – शिवतीर्थनगर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – अ- हर्षवर्धन दीपक मानकर, ब-तृप्ती निलेश शिंदे, क – कांता नवनाथ खिलारे
भाजप – अ- अभिजित राऊत, ब- शर्मिला नितीन शिंदे, क- मनीषा संदीप बुटाला, ड – अजय मारणे
महाविकास आघाडी काँगेस- रामचंद्र कदम, नयना सोनार, दिपाली ढोक ,
शिवसेना उध्दव ठाकरे – बाळासाहेब धनावडे
प्रभाग क्रमांक 31- मयूर कॉलनी – डहाणूकर कॉलनी
भाजप – पृथ्वीराज सुतार, दिनेश माथवड, वासंती जाधव,
ज्योत्स्ना जगन्नाथ कुलकर्णी
महाविकास आघाडी – शिवसेना – योगेश मोकाटे, किशोर शिंदे, प्रज्ञा लोणकर-जोशी, सुप्रिया संजय काळे
बातमी अपडेट होत आहे.



