कोथरूड चांदणी चौक येथे भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

अभिषेक, भव्य पालखी सोहळा, रक्तदान व नेत्र तपासणी शिबिर, जन्मोत्सव-पाळणा चे आयोजन
कोथरुड : कोथरूड येथील चांदणी चौकातील श्री १००८ भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर येथे भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नित्य अभिषेक, ध्वजारोहण, चढावे, पूजन, महाभिषेक, भगवान महावीरांचा भव्य पालखी सोहळा, महाआरती, सत्कार समारंभ, वार्षिक आढावा वाचन, जन्मोस्तव-पाळणा, महाप्रसाद इ. विविध धार्मिक तर रक्तदान व नेत्र तपासणी शिबीर तसेच जैन पाककला स्पर्धा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

महावीर जन्मकल्याणक महोत्सव निमित्त मंदिर परिसरात मंडप उभारून नेत्रदीपक विदयुत रोषणाई करण्यात आली होती.
भगवान महावीर यांचा २६२४ वा जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त नित्य अभिषेक झाल्यानंतर ध्वजारोहणचा मान अशोक मगदूम परिवार तर पालखी मिरवणूक चा मान वर्धमान प्रेस चे मेहता परिवार व जिनवाणी शास्त्रचा मान सुषमा दोशी यांना मिळाला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे व नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये 108 जणांनी रक्तदान केले तर 351 लोकांनी नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेतला, यासाठी पुणे ब्लड बँक व देशपांडे डोळ्यांचे हॉस्पिटल यांचे सहकार्य लाभले
सकाळी ९ वाजता भगवान महावीर यांची प्रतिमा चांदीच्या पालखीत विराजमान करून पालखी सोहळ्यास सुरवात झाली. यावेळी त्रिशला नंदन वीर की जय बोलो महावीर की, अहिंसा परमो धर्म व नमोकार महामंत्राचा जयघोषात भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये अग्रभागी जैन महिला मंडळ आराधना ग्रुप चे लेझीम पथक सहभागी झाले होते. सुमधुर बँडच्या तालावर जैन युवक-युवतींनी गरबा खेळण्याचा आनंद लुटला.



मुख्य मूर्तीचा अभिषेक, शांतिधारा व महाआरती मंदिर मध्ये संपन्न झाली. दुपारी १२ वा. भगवान महावीरांचा जन्मोस्तव-पाळणा संपन्न झाला. यावेळी भगवान महावीर यांचा अभिषेकचा मान राजेश सोनी, त्रिशला मातेचा प्रांजली सूरज मगदूम, व आत्या चा मान रेणुका बंडी यांना मिळाला.धर्म प्रवचन पंडितजी सागर हुक्कीरे यांनी केले.
जन्मकल्याणक महोत्सव निमित्त आमदार भीमराव तापकीर, नगरसेविका मोनिका मोहोळ, नगरसेवक दिलीप वेडेपाटील , नगरसेवक किरण दगडे पाटील, नगरसेविका अल्पना वरपे, नगरसेविका वासंती जाधव, नगरसेविका श्रद्धा प्रभुणे पाठक, नवनाथ जाधव, गणेश वरपे, धनंजय दगडे पाटील आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.



यावेळी भगवान महावीर मंडळ व जैन मंदिराचे विश्वस्त दिनेश गणेशवाडे, मोहन कुडचे, श्रीकांत पाटील, ज्योती बुरसे, शिरीष बोरगावे, रमेशभाई शहा, उदय लेंगडे, अजित शेट्टी, सुनील बिरनाळे, महावीर पालगौडर, प्रीतम मेहता, प्रकाश कुडचे, तात्यासाहेब खोत, अशोक मगदुम, शोभा पोकळे, प्रकाश कुडचे तसेच सर्व कमिटी सदस्य उपस्थित होते. भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव निमित कोथरूड व बावधन परिसरातील जैन समाजातील बांधव मोठ्या संख्येने विविध धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाले होते.



