राष्ट्रीय

फक्त 633 रुपयांना गॅस सिलेंडर; या कंपनीची आहे खास ऑफर

नवी दिल्ली : सध्या देशात गॅस सिलेंडरच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. सर्वसामान्य माणसाला रोजचा जगण्याचा खर्च भागवणेही अवघड झाले आहे. देशातील सरकारी तेल कंपन्यांनी ग्राहकांसाठी एक चांगला पर्याय आणला आहे. यामध्ये गॅस सिलेंडर स्वस्तात म्हणजेच फक्त 633 रुपयांमध्ये मिळणार आहे.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

आता नव्याने गॅस सिलेंडर बुकिंग करणाऱ्यांसाठी एक खूशखबर आहे. एलपीजी गॅस सिलेंडर आता स्वस्तात मिळणार आहे. इंडेन कंपनी फक्त 633 रुपयांमध्ये गॅस सिलेंडर देत आहे. इंडेनने आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी कंपोझिट सिलेंडर आणले आहे. हा सिलेंडर फक्त 633.5 रुपयांत येत आहे. शिवाय हे सिलेंडर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज हलवणे शक्य आहे.कंपोझिट सिलेंडर वजनाने हलके आहेत आणि त्यात 10 किलो गॅस मिळणार आहे. त्यामुळेच या सिलेंडरची किंमत कमी आहे.

हा सिलेंडर लवकरच सर्व शहरांमध्ये उपलब्ध होईल. IOCL च्या वेबसाइटनुसार, या सिलेंडरची मुंबईत किंमत 634 रुपये, कोलकत्यात 652 रुपये, चेन्नईमध्ये 645 रुपये, लखनऊमध्ये 660 रुपये, इंदूरमध्ये 653 रुपये, भोपाळमध्ये 638 रुपये आहे तर गोरखपूरमध्ये 677 रुपये किंमत असल्याची माहिती इंडियन ऑइलने दिली आहे.

जानेवारी महिन्यात 14.2 किलोच्या सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत 14.2 किलोच्या विनाअनुदानित गॅस सिलेंडरची किंमत 899.50 रुपये, कोलकत्यात 926 रुपये, मुंबईत 899.5 रुपये आणि चेन्नईमध्ये 915.5 रुपये आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये