कोथरुडपुणे शहर

कोथरुडमधील वीजपुरवठ्यासंदर्भात आमदार चंद्रकांत पाटील यांची महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक

पुणे : कोथरुडमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या तक्रारी येत असून, यासंदर्भात भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी वीजपुरवठा सुरळीत करण्यातील अडचणी जाणून घेतल्या. तसेच गरज पडल्यास अंडरग्राऊंड केबल्ससाठी आमदार निधीतून निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.

या बैठकीला कोथरुड-पौड रोड विभागाचे महावितरणचे कार्यकारी अभियंता अमित बारटक्के, अतिरिक्त कार्यकारी अभियंता भगवंत सावदे, वारजे विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता गवळी, कोथरुड-बावधन प्रभाग समिती स्विकृत नगरसेवक बाळासाहेब टेमकर आदी उपस्थित होते.

गेल्या अनेक महिन्यांपासून कोथरुड मतदारसंघातील सृष्टी सोसायटी, वात्सल्य नगरी, गुरु गणेशनगर, वृंदावन, मौर्य गार्डन, शांतीबन, एकलव्य परिसर, रोहन गार्डन, सागर कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी, भुसारी कॉलनी, परमहंसनगर, रामबाग कॉलनी, डाहणूकर कॉलनी, महात्मा सोसायटी, गांधी भवन, वारजे परिसर आदी भागांत वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून, याबाबतच्या अनेक तक्रारी श्री. पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात येत आहेत. काही ठिकाणी तर एक फेज लाईट असणे, डीपीचे वारंवार होणारे स्फोट व त्या मुळे होणारा खंडित वीजपुरवठा अशा तक्रारी येत आहेत.

या तक्रारींची दखल घेऊन पाटील यांनी महावितरणसोबत आवश्यक तो पत्रव्यवहार करुन पाठपुरावा केला होता. पण या तक्रारी कमी न झाल्याने आदरणीय दादांनी आज संबंधित सर्व अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन सविस्तर चर्चा करुन अडचणी जाणून घेतल्या. यावेळी अधिकाऱ्यांनी विभागातील अंडरग्राऊंड केबल्स करणे, नवीन ट्रान्सफार्मर बसवणे आदी कामांसाठी महानगरपालिके तर्फे परवानगी न मिळाल्यामुळे अनेक कामे प्रलंबित असल्याचे पाटील यांना सांगितले.

यावर पाटील यांनी महापालिकेतील विषयासाठी पुढील आठवड्यात मनपा आयुक्त व विद्युत विभाग व महावितरण अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढण्याची ग्वाही दिले. तसेच वीजपुरवठा सुरळीत राहण्याच्या दृष्टीने अंडरग्राऊंड केबलच्या कामासाठी गरज पडल्यास आमदार निधीतून निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.

8 3
7 12
Screenshot 2020 10 12 12 19 40 67
Screenshot 2020 10 11 11 07 57 41 2

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये