पुणे शहर
शिवसेना पुणे उपशहर प्रमुखपदी नितीन पवार यांची नियुक्ती

पुणे : नितीन पवार यांची शिवसेना पुणे उपशहर प्रमुख नियुक्ती करण्यात आली आहे.शिवसेना सचिव संजय मोरे यांनी पवार यांना उपशहर प्रमुख पदाचे नियुक्तीपत्र दिले.
यावेळेस शहर प्रमुख नाना भानगिरे, शुभम कांबळे, जितेंद्र खोतकर, गणेश वांजळे, अशोक हराळकर व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
नितीन पवार म्हणाले, पक्षाने दिलेली मोठी जबाबदारी आहे. आगामी महानगर पालिका निवडणूकीत पक्षाला अपेक्षित यश मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. निवडणूकीसाठी तयारी सुरू झाली आहे. या पुण्यातील निवडणूकीत शिवसेनेचा भगवा सर्वत्र फडकताना दिसेल. याची मला खात्री आहे.













