पुणे शहर

क्रांतिकारक पां.स.खानखोजे यांच्या १३९ व्या जयंती निमित्त “द ब्रेड ऑफ लाइफ-डॉ.खानखोजे”(द अनसंग हिरो) या हिंदी नाटकाचा प्रयोग

पुणे: क्रांतिकारी गदर संस्थेचे संस्थापक व प्रतिभावंत कृषी शास्त्रज्ञ डॉ.पांडुरंग सदाशिव खानखोजे यांच्या जीवनावरील नाटक “द ब्रेड ऑफ लाइफ-डॉ.खानखोजे”(द अनसंग हिरो) या हिंदी नाटकाचा प्रयोग बालगंधर्व रंगमंदिर येथे करण्यात आला. १३९ व्या जयंती निमित्त क्रांतिकारक पां.स.खानखोजे स्मृती संस्थेने याचे आयोजन केले होते.या वेळी डॅा खानखोजे यांच्या प्रतिमेला हार घालून अभिवादन करण्यात आले.

Img 20231109 wa00081144410606180315579

या कार्यक्रम प्रसंगी या संस्थेचे पदाधिकारी व डॉ.खानखोजे यांची नातवंडे दिलीप खानखोजे,डॉ.प्रशांत खानखोजे, सौ मिना कर्दळे खानखोजे,संस्थेचे अध्यक्ष सुनील खानखोजे, संस्थेचे सल्लागार डॅा भाले, “डॉ.खानखोजे –नाही चिरा”या पुस्तकाच्या लेखिका वीणा गवाणकर, अन्य मान्यवर व कुटुंबीय ज्योती, राजश्री, प्राजक्ता, सरिता खानखोजे व ईतर खानखोजे कुटुंबीय उपस्थित होते.

मेराकी या संस्थेने या नाटकाची निर्मिती केली असून मंगला सानप यांनी लेखन व दिग्दर्शन केले आहे. या प्रसंगी बोलतांना डॉ.प्रशांत खानखोजे यांनी देशाच्या स्वातंत्र्य व कृषी या क्षेत्रांत केलेल्या डॉ.पा.स.खानखोजे यांच्या कार्याच्या माहिती सध्याच्या पिढीला व्हावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सांगितले.

Img 20231109 wa00128330767081325070842
Img 20230717 wa0012281292712276676815194924
Img 20230511 wa0002282296555721650380460122

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये