पुणे शहर

पुण्यात येत्या २४ ऑक्टोबरला ‘प्लॉगेथॉन’चं आयोजन; सर्व पुणेकरांनी सहभागी होण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचे आवाहन

पुणे : पुणे शहरात येत्या २४ ऑक्टोबर रोजी ‘प्लॉगेथॉन’चं आयोजन करण्यात येत असून या आयोजनासंदर्भात आज नियोजन बैठक घेतली. २०१९ साली प्लॉगेथॉनचं आयोजन करुन पुणे हे देशातील पहिलं शहर झालं होतं. प्लॉगेथॉन म्हणजे वॉक अर्थात चालता चालता कचरा गोळा करुन शहराच्या स्वच्छतेला हातभार लावणं. आपण सर्वात आधी २०१९ ला ज्यावेळी आयोजन केलं होतं, त्यावेळी त्यात एक लाख पुणेकरांनी सहभाग नोंदवत नवा विक्रम केला होता. यंदाही स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत हा उपक्रम राबवत असताना जास्तीत जास्त पुणेकर यात सहभागी होतील. या दृष्टीने हे नियोजन करण्यात येत आहे. अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

बैठकीला उपमहापौर सुनीता वाडेकर, सभागृह नेते गणेश बिडकर, आयुक्त विक्रम कुमार, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, आरपीआयच्या गटनेत्या फरजाना शेख यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, सर्व उपायुक्त उपस्थित होते.

पुणे महापालिका निवडणुकीत प्रभाग कसा जोडला जाईल? कसा तोडला जाईल? जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://fb.watch/8sSWWrlhK5/

Img 20211005 wa0014

प्लॉगेथॉनचा उपक्रम राबवताना सुक्ष्म पध्दतीने नियोजन करणे, वॉर्ड स्तरावरही बारकाईने नियोजन करणे, पुणेकरांमध्ये जागरूकता निर्माण करणे, नागरिकांचा सहभाग वाढवणे, प्रभावशाली व्यक्तिमत्वांना मोहिमेत सहभागी करुन घेणे आदी विषयावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. असेही मोहोळ म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये