भुसारी कॉलनी ते वारजेपर्यंत सर्व्हिस रस्ता खुला होणार ; अल्पना वरपे यांच्या पाठपुराव्याला यश..

कोथरुड : pune city, Kothrud डावी भुसारी कॉलनीतील शृंगेरी मठ येथील महामार्गालगतचे सर्व्हिस रस्त्याचे काम गेले अनेक दिवस रखडले होते. नागरिकांच्या सोयीसाठी व चांदणी चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हे काम पूर्ण व्हावे यासाठी नगरसेविका अल्पना वरपे यांच्याकडून पाठपुरावा करण्यात येत होता. त्या पाठपुराव्याला यश आले असून आता हे काम सुरू झाले आहे. येथील रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर भुसारी कॉलनीपासून थेट वारजेपर्यंत नागरीकांना सर्व्हिस रस्त्याने जाता येणार आहे.
सध्या चांदणी चौकात बहुमजली उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. हे काम सुरू असल्याने चौकात वाहतूक कोंडी होत आहे. महामार्गावरील डुक्कर खिंड ते वारजे पर्यंत सर्व्हिस रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र डुक्कर खिंड ते चांदणी चौक डावी भुसारी कॉलनी या टप्प्यात काही ठिकाणी सर्व्हिस रस्त्याचे काम गेले अनेक दिवसांपासून रेंगाळलेले होते. त्यामुळे सर्व्हिस रस्त्याचा वापर करणे नागरीकांना शक्य होत नव्हते. चांदणी चौकात होणाऱ्या कोंडीमुळे हे रखडलेले सर्व्हिस रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी होत होती. स्थानिक नगरसेविका अल्पना वर्पे यांच्याकडूनही भारतीय राष्ट्रिय महामार्गाचे प्रकल्प संचालक चिटणीस साहेब यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा चालू होता. आता सर्व्हिस रस्त्याचे काम सुरू झाल्याने मोठा प्रश्न सुटणार आहे व भुसारी कॉलनी ते डुक्कर खिंड व पुढे वारजे पर्यंत सर्व्हिस रस्त्याने जाणे सोपे होणार आहे.
तीनचा प्रभाग कसा जोडणार ? कसा तोडणार ?खालील लिंकवर क्लिक करा..
डावी भुसारी कॉलनी शृंगेरी मठ येथून महात्मा सोसायटी डी पी रोड कडे जोडला जाणारा सर्विस रोडचे काम पूर्ण झाल्यास निश्चितच चांदणी चौकातील वाहतूक कमी होऊन नागरिकांना वाहतूक कोंडीचा नाहक त्रास सहन करावा लागणार नाही व अपघाताचे प्रमाण कमी होईल. प्रत्यक्षात कामाला सुरूवात झाली असून २-३ महिन्यातच सदर रस्ता वातुकीसाठी खुला होईल व फक्त भुसारी काॅलनीच नाही तर कोथरूड परिसरातील नागरीकांना या रस्त्याचा फायदा होईल असे नगरसेविका सौ.अल्पना गणेश वरपे यांनी सांगीतले.
