कोथरुड

किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन शिबीराचे पल्लवी गाडगीळ यांच्या वतीने आयोजन

कोथरूड : भारतीय जनता पार्टी कोथरूड मतदार संघाच्या महिला उपाध्यक्षा आणि नीता  फाउंडेशनच्या पल्लवी गाडगीळ यांच्या माध्यमातून किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते

या शिबिरामध्ये किशोरवयीन मुलींना वयाच्या बदलातिल माहिती व घ्यावी लागणारी काळजी,कोणत्या वेळेस कोणते साहित्य वापरावे कोणते वापरु नयेत. यांची माहिती देण्यात आली व लागणारी साहित्य यांचे वाटप करण्यात आले या सर्व साहित्याचे  वाटप व मार्गदर्शन हे पल्लवी गाडगीळ यांनी केले.

या वेळेस या मार्गदर्शन शिबिरामध्ये कोथरूड मतदारसंघातील अनेक  किशोरवयीन मुली उपस्थित होत्या. या मुलींनी स्वताहुन यामध्ये भरपूर प्रकारे सहभाग घेतला होता व या मुलींनी पल्लवी गाडगीळ यांचे आभार मानले व अशा उपक्रमास समाजातील लोकांनी सहभाग घेऊन अशा प्रकारे एक समाज हिताचे काम करावे असा संदेश दिला.

Img 20211005 wa0014

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये