पुणे शहर

महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात चांदणी चौकात पुणे जिल्हा भाजपचे आंदोलन..

कोथरुड: महाविकास आघाडी सरकारच्या राजीनाम्यासाठी भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा, मुळशी तालुका, युवा मोर्चा च्या वतीने चांदणी चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. Pune district BJP’s agitation against the Mahavikas Aghadi government

संघटन सरचिटणीस धर्मेंद्रजी खांडरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष नगरसेवक किरण दगडे पाटील, भाजपाचे मुळशी तालुकाध्यक्ष विनायक ठोंबरे, तालूका उपाध्यक्ष सुनील दगडे, महिला आघाडी अध्यक्ष वैशाली सणस, युवा मोर्चा सरचिटणीस जीवन साखरे, प्रभाग 10 अध्यक्ष सागर कडू, तेजस मारणे, राजेश मनगिरे, स्वीकृत सभासद विलास मोहोळ, प्रदीप जोरी, निखिल करंजावणे, प्रभाग 10 अध्यक्ष कैलास मोहोळ उपस्थित होते..

युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष, नगरसेवक किरण दगडे पाटील म्हणाले की, पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर सरकारचा चेहरा जनतेसमोर आला आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे.

Img 20210319 wa0097

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये