पुणे शहर

सणासुदीला पुणेकरांना धक्का, CNG च्या दरात मोठी वाढ

पुणे : सणासुदीमध्ये आधीच महागाई वाढली आहे. इंधनाचे दर कडाडले आहेत तर दुसरीकडे RBI ने व्याजदरात वाढ केल्याने EMI आणि कर्ज वाढले आहेत. त्यापाठोपाठ आणखी एक धक्का मिळाला आहे. पुण्यात CNG च्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे रिक्षा आणि कारने फिरणं म्हणजे खिसा रिकामा करण्यासारखं होणार आहे. पुणे शहरात सीएनजीची वाटचाल शंभरीकडे होत असून पुणे व पिंपरी चिंचवड, चाकण, तळेगाव आणि हिंजवडी परिसरातील सीएनजीच्या दरामध्ये वाढ करण्यात आली आहे.

CNG च्या दरात पुन्हा एकदा 4 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आता प्रती लिटर CNG साठी पुणेकरांना 91 रुपये मोजावे लागणार आहेत. आजपासून हे नवे दर लागू करण्यात येणार आहेत. ऐन सणासुदीच्या काळात ही वाढ झाल्याने नागरिकांना धक्का मिळाला आहे.

Img 20221002 wa00336747559301287894157

दुसरीकडे रिक्षा आणि टॅक्सीचे दर मुंबईत अनेक ठिकाणी वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे तुम्ही जर सणासुदीच्या काळात मुंबई-पुण्यात प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे.

दुसरीकडे दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या चार महानगरांमध्ये इंधनाच्या दरात कोणताही बदल झाला नाही. त्यामुळे इंधनाचे दर गेल्या आठवड्यापासून स्थिर आहेत.

Img 20220924 182515 453
Img 20220910 wa0003

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये