महाराष्ट्र

राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित झाल्याची माहिती खुद्द राज ठाकरे यांनीच ट्विटरवरुन दिली आहे. पुण्यातील सभेमध्ये आपण यावर सविस्तर बोलणार असल्याचं राज यांनी स्पष्ट केलं आहे.

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंग यांचा होता तीव्र विरोध आहे. उत्तर भारतीयांची माफी मागा आणि मगच अयोध्याला या अशी ब्रिजभूषण सिंग यांची अट आहे. मात्र आता प्रकृतीसंदर्भातील कारणामुळे तुर्तास राज यांचा हा दौरा रद्द करण्यात आला आहे. याबाबत २२ मे रोजी पुण्यात होणाऱ्या सभेत राज ठाकरे भाष्य करतील भूमिका मांडतील असे संकेत राज यांनी ट्विटरवरुन पोस्ट केलेल्या पोस्टमध्ये दिलेत.

राज यांनी ‘तूर्तास अयोध्या दौरा स्थगित’ असं वाक्य असणारी पोस्ट ट्विटरवरुन केलीय. पुढे ‘महाराष्ट्र सैनिकांनो, या! यावर सविस्तर बोलूच… रविवारी दिनांक २२ मे रोजी सकाळी १० वाजता गणेश कला क्रीडा केंद्र, पुणे’ येथे असंही या पोस्टमध्ये म्हटलंय. एक ते दीड वर्षांपूर्वी राज यांच्या पायाला दुखापत झाली होती. या दुखापतीसंदर्भात मध्यंतरी त्यांनी उपचार घेतले होते. मात्र आता हा त्रास त्यांना पुन्हा सुरु झाला आहे.

पुण्यातील सभेनंतर राज डॉक्टरांचा पुन्हा सल्ला घेणार आहेत. सल्ल्यानुसार दौऱ्यासंदर्भातील पुढील तारीख आणि धोरण निश्चित केलं जाईल. राज यांच्या पायासंदर्भातील समस्येवर उपचार म्हणून शस्त्रक्रिया करण्याची पुन्हा गरज लागू शकते, असा डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज असल्याचंही सांगितलं जात आहे.

Img 20220519 wa0035
Img 20220518 wa0013505028502486174026

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये