राज ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका..म्हणाले पंतप्रधानांना हे शोभत नाही..

पिंपरी-चिंचवड : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. ठाकरे टीका करताना म्हंटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी देशातील प्रत्येक राज्य समान असलं पाहिजे. त्यांनी संपूर्ण देशाकडे लक्ष दिले पाहिजे. आपण स्वत: गुजराती आहोत, त्यामुळे गुजरातला प्राधान्य देणं हे एका पंतप्रधानाला
शोभत नाही.
राज ठाकरे हे पिंपरी चिंचवड येथील जागतिक मराठी संमेलनात बोलत होते. ठाकरे व भाजप नेत्यांच्या सध्या सातत्याने भेटी गाठी होत आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप मनसे युती होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अशातच राज ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच टीका केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
ठाकरे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त एका राज्याकडे पाहू नये असे मी 2014 मध्ये म्हणालो होतो आणि आजही माजी तीच भूमिका आहे. आपल्याला काही गोष्टी पटल्या नाहीत म्हणून आपण 2019 मध्ये लावरे तो व्हिडिओ हे कॅम्पन केल्याचे त्यांनी सांगितले.







