कोथरुड

कोथरूड बावधन मध्ये पार पडले महास्वच्छता अभियान..

कोथरुड : कोथरुड बावधन परिसरात महास्वच्छता अभियान आज पार पडले . कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय पुणे महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने प्रभाग क्रमांक १०, ११,१२ एकूण १५ आरोग्य हजेरी कोठ्या अंतर्गत “स्वच्छ भारत अभियान व स्वच्छ सर्वेक्षण मिशन – २०२३ व जी- २० परिषदे अन्वये” महास्वच्छता अभियान राबवण्यात आले.

डहाणूकर कॉलनी, कोथरूड गावठाण, कर्वेरस्ता, मयूर कॉलनी, संपूर्ण पौड रोड, एम.आय.टी. कॉलेज रोड, कर्वे पुतळा ते एकलव्य कॉलेज रोड, चांदणी चौक, बावधन रोड तसेच बावधन खुर्द व बुद्रूक परिसरातील मुख्य रस्त्यांवर हे महास्वच्छता अभियान राबवण्यात आले. सदर स्वच्छता अभियानात ४ हजार किलो पालापाचोळा, ८०० किलो कागद, प्लास्टिक, रॅपर, गुटख्याचे रिकामे पाकीट व अन्य इतर कचरा जमा करण्यात आला.

पुणे महानगरपालिका, कमिन्स इंडिया लिमिटेड कंपनी, जनवानी सहकारी संस्था, सेवा संयोग फाउंडेशन, स्वच्छ सहकारी संस्था, हर्षदीप फाउंडेशन,नेचर डीलाईट फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान राबवण्यात आले.

Img 20221126 wa02126927299965323449855

सदर अभियानात प्रत्येक आरोग्य कोठी अंतर्गत राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रातील ज्येष्ठ, ,श्रेष्ठ, कनिष्ठ, सन्माननीय पुरुष व महिला तसेच तरुण असे ५०० मान्यवर नागरिकांनी व २५० शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन स्वच्छता अभियानाला प्रत्यक्ष हातभार लावला. सदर अभियानात महापालिका सहाय्यक आयुक्त मा. केदार वझे यांनी अभियानात सहभागी झालेल्या मान्यवर नागरिकांचे आभार मानले.

Screenshot 2023 01 08 08 59 52 656861846410993924730

या अभियानात कमिंन्स इंडिया लिमिटेड कंपनीचे संपत खैरे, संजय ,गोळे, सोमनाथ वाले, जनवाणी सहकारी संस्थेचे जयश्री पाटील, मनीषा शेलार, समीर आजगेकर, सेवासहयोगचे महेश शेळके, युवराज चाबुकस्वार, रोटरी क्लब ऑफ पुणे सहवासचे किरण इंगळे, नेचर डिलाईट फाउंडेशन महानंदा वाले, विद्या घोरपडे, वैष्णवी वाले, हरिश्चंद्र पाटील, शिवाजी घोरपडे तसेच सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब दांडेकर, राजाभाऊ गायकवाड, मेधा सराफ, अद्वैत आठवले, व्यापारी संघाचे शशिकांत उभे इत्यादी स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले.

अभियान वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य निरीक्षक सचिन लोहकरे, करण कुंभार, वैभव घटकांबळे, रूपाली शेडगे, संतोष ताटकर, हनुमंत चाकणकर, नवनाथ मोकाशी, प्रमोद चव्हाण, गणेश साठे, गणेश चोंधे, शिवाजी गायकवाड, सतीश बनसोडे मोकादम राम गायकवाड, अशोक खुडे, साईनाथ तेलंगी, अशोक कांबळे, संजय कांबळे, गणेश चव्हाण, सुभाष पड्ये, सुनिल भोसले, गजानन कांबळे, लक्ष्मण सोनवणे, वैजीनाथ गायकवाड व आण्णा ढावरे यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये