महाराष्ट्र

जेव्हा आमच्या अंगात शिवाजी येईल ; राज ठाकरे यांनी भाषणात दिला डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या वक्तव्याचा दाखला ;

औरंगाबाद : औरंगाबाद मध्ये आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची सभा पार पडली. या सभेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजावून घ्या असे आवाहन उपस्थितांना केले. यावेळी आपल्या भाषणात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं वक्तव्याचा दाखला देताना सांगितलं की, आमच्या लोकांच्या अंगात देवी आणि भुतं येतात, यावर बाबासाहेब म्हणतात ज्या दिवशी या लोकांच्या अंगात शिवाजी येईल तेव्हा सर्व जग पादाक्रांत करू त्यामुळे आमच्या अंगात शिवाजी आला पाहिजे असे ते म्हणाले.

फक्त महापुरुषांच्या पुण्यतिथी आणि जयंती साजरी करतो. पण इतिहास काहीच माहित नसतो असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांचीही कान टोचले.

भोंग्याच्या मुद्द्यावर बोलताना ठाकरे म्हणाले, उत्तर प्रदेश मध्ये मशिदीवरील भोंगे उतरवण्यात आले, मग महाराष्ट्रात का उतरवले जात नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.३ तारखेला ईद आहे. आम्हाला कोणाच्या सणात व्यत्यय आणायचा नाही परंतु 4 तारखेपासून सर्व मशीदिंसमोर स्पीकर लावून हनुमान चालीसा लावण्याचे आव्हान ठाकरे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.

सर्व मशीदिंवरील लाऊड स्पीकर अनधिकृत आहेत. पोलिसांना विचारल्याशिवाय लाऊडस्पीकर लावू शकत नाही. कोर्टाच्या निर्णयानुसार कार्यवाही होणे आवश्यक आहे. पण त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यावेळी पुन्हा राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर जातीय राजकारण पसरवण्याचा आरोप केला

सभेच्या वेळी अजान सुरू होताच त्याचाही समाचार राज ठाकरेंनी घेतला. ज्या वेळी बांग देत असतील तर त्यांची तोंड आत्ताच्या आत्ता बंद करा त्यांना सरळ भाषेत समजत नसेल तर एकदा काय ते होऊन जाऊ दे अजिबात शांत बसता कामा नये महाराष्ट्रातील मनगटात काय ताकत आहे त्यांना दाखवून द्या इशारा त्यांनी यावेळी दिला. लाऊड स्पीकर हा सामाजिक विषय आहे तो धार्मिक विषय नाही त्याला धार्मिक पळून देणार असेल तर उत्तर आम्हाला धर्मानेच द्यावा लागेल एवढे लक्षात ठेवा इच्छा नसतानाही टोकाची भूमिका घ्यायला लावू नका असेही ते म्हणाले.

Img 20220501 wa00012175545557242732791

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये