राष्ट्रसेवा प्रतिष्ठान आयोजित “आयुष्यावर बोलू काही” व बावधन–कोथरूड भूषण पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

पुणे : राष्ट्रसेवा प्रतिष्ठानच्या वतीने प्रसिद्ध गीतकार–गायक सलील कुलकर्णी, शुभंकर कुलकर्णी व संदिप खरे यांच्या सादरीकरणात “आयुष्यावर बोलू काही – अविस्मरणीय कार्यक्रम” गुरुवार, दि. १८ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता, छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण, एल.एम.डी. चौक, बावधन येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
जीवनातील वास्तव, संवेदना, माणुसकी व अनुभव यांची प्रभावी मांडणी करणाऱ्या या कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून उपस्थितांच्या मनावर या सादरीकरणाने खोल ठसा उमटवला.

याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने बावधन–कोथरूड भूषण पुरस्कार सोहळा पार पडला. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना हा पुरस्कार राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
पुरस्कारार्थी म्हणून जगद्गुरु यांकित डॉ. चेतनानंद महाराज, मनोज वेल्डे, एन.डी. मारणे सर, अॅड. पी. नारायण, राजेंद्र बांदल, कु. महेश नानगुडे, अग्मिता चिंचाळकर, कु. स्वेद ज्ञानेछर बारगुजे, सुचित्रा साठे, अनिल पंचचाय, डॉ. कल्याण कुर्तकोटी, अधिनी नावर यांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्या नेतृत्वाखाली बावधन–कोथरूड परिसरात झालेल्या अनेक विकासकामांचा, सामाजिक उपक्रमांचा व सेवाभावी कार्याचा विशेष उल्लेख करत त्यांचे मनापासून कौतुक केले, तसेच राष्ट्रसेवा प्रतिष्ठानच्या उपक्रमांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.हा संपूर्ण कार्यक्रम सामाजिक जाणीव, सांस्कृतिक मूल्ये आणि कर्तृत्वाचा गौरव करणारा ठरला आणि मोठ्या दिमाखात संपन्न झाला. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रसेवा प्रतिष्ठान, बावधनचे संस्थापक अध्यक्ष व माजी नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी केले होते.



