भाजपने डावलले पण विनोद मोहिते यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची उमेदवारी…

पुणे : भारतीय जनता पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर नाराज झालेल्या विनोद मोहिते यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश करीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये असलेले विनोद मोहिते यांना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजप मध्ये प्रवेश करुन घेतला होता. त्यावेळी आणि गेल्या विधानसभा, लोकसभा निवडणुकीत विनोद मोहिते यांनी काम केले होते.

कर्वेनगर होम कॉलनी प्रभागातून विनोद मोहिते भाजप उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र पक्षाने तिकीट नाकारले आणि मोहिते यांनी बंडखोरीचा निर्णय घेत एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करीत उमेदवारी अर्ज दाखल केला.
विनोद मोहिते म्हणाले, चंद्रकांत दादा पाटील यांच्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत मला पाटील यांच्या कडून विचारणा झाल्यानंतर मी भाजप मध्ये प्रवेश केला होता. गेली सहा वर्षे मी निष्ठेने पक्षासाठी काम केले. मात्र पक्षाने माझी उमेदवारी नाकारली. त्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागला. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर विश्वास दाखवत मला उमेदवारी दिली आहे. मी या भागात शिवसेनेचा भगवा फडकणारच येथील जनता माझ्यासोबत आहे.



