राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस पदी सचिन दांगट यांची निवड

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी सचिन दशरथ दांगट यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांच्या वतीने त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे. सचिन दांगट गेले अनेक वर्षापासून राजकीय आणि सामाजिक कार्यात पुणे शहरात सक्रिय आहेत, त्यांनी नुकताच महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे.
सचिन दांगट हे भारतीय जनता पक्षामध्ये सहकार आघाडीचे पुणे शहराध्यक्ष म्हणून काम बघत होते. तसेच ते पुणे महापालिकेचे माजी स्वीकृत सभासद आहेत. शांत आणि मितभाषी असलेल्या सचिन दांगट यांचा मोठा मित्र परिवार आहे.
पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलेली जबाबदारी पार पाडण्याचा माझा पूर्ण प्रयत्न राहील तसेच पक्ष संघटना वाढीसाठी काम करणार असल्याचे सचिन दांगट यांनी निवडीनंतर म्हंटले आहे.




