पुणे शहर

शिवणेमध्ये विजेच्या धक्क्याने शाळकरी मुलाचा मृत्यू

पुणे : कुंपणात उतरलेल्या वीजप्रवाहाचा धक्का बसून शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना एनडीए रस्त्यावरील शिवणे भागात घडली. शुभम बाळू इंगोले (वय १६, रा. ढोणे हाइट्स, शिंदे पुलाजवळ, शिवणे) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे.

Fb img 16837376233493064729888638918603

शुभम हा शिवणे भागातील नवभारत हायस्कूलमध्ये दहावीत होता. तो सकाळी अकराच्या सुमारास शाळेत निघाला होता. शिवणे भागताील देशमुखवाडी परिसरातील छोट्या गल्लीतून तो मित्राकडे जात होता. तेथील एका कुंपणाच्या लोखंडी जाळीत वीजप्रवाह उतरला होता. शुभमने जाळीला स्पर्श केला आणि विजेचा धक्का बसून तो कोसळला. त्याला नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आल्यानंतर परिसरात शोककळा पसरली. या प्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. पोलीस, तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करुन पंचनामा केला.

Img 20220425 wa001080841499313169957854513307260893077682

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये