शिवसेना (उध्दव ठाकरे) आमदारांच्या तर्फे विधानसभेत वकीलपत्र दाखल ; ॲड. असीम सरोदे यांनी उपस्थित केला महत्वाचा प्रश्न

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेत पात्र कोण व अपात्र कोण?, संविधानिक कोण? कायदेशीर कोण? याचा निर्णय होण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असे चित्र निर्माण झाले आहे कारण ॲड. असीम सरोदे ,ॲड. सनी जैन ॲड. श्रीया आवले, ॲड. बाळकृष्ण निढाळकर यांनी आज मूळ शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) यांच्या आमदारांच्या तर्फे आज विधानसभेत वकीलपत्र दाखल केले आहे.
उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेना आमदारांना अपात्रतेच्या नोटिसेस कशाच्या आधारे दिल्यात असा प्रश्न आज विधानसभेच्या सचिवांच्याकडे वकीलपत्र दाखल करता ॲड.असीम सरोदे यांनी उपस्थित केला.
कैश्याम मेघचंद्रसिंग विरुद्ध मणिपूर विधानसभा या केसच्या प्रकरणातील निकालाचा हवाला वकिलपत्रासोबतच्या लेखी अर्जात देऊन अपात्रतेची कार्यवाही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर 3 महिन्याच्या आत करणे अपेक्षित होते असे सुद्धा त्यांनी नमूद केले आहे. याप्रकरणी 14 तारखेपासून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समक्ष नियमित सुनावणी सुरू होणार आहे.







