कोथरूडची भाजी मंडई सुरु करा… उदघाट्ना अभावी कोट्यावधी रुपयांची इमारत धूळ खात पडून…

राष्ट्रवादी युवक कोथरूडचे पुणे शहर आयुक्य नवल किशोर राम यांना निवेदन….
पुणे : लोकनेते गोपीनाथ मुंडे बहुउद्देशीय हॉल व श्रीमती सुमनताई रामचंद्र माथवड भाजी मार्केट इमारतीला प्रत्यक्षात वापरात आणण्यासाठी, लोकांच्या सेवेसाठी भाजी मंडई तातडीने खुली करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कोथरूड विधानसभा अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी आज पुणे शहराचे आयुक्त नवल किशोर राम यांना दिले आहे.
या वेळी गिरीश गुरनानी म्हणाले पुण्यातील कोथरूड उपनगर येथे असलेल्या सुतार दवाखान्याजवळ मोठी वर्दळ अनेक भाजी व फळ विक्रेते येथे रस्त्यावर आपला माल विकत असतात.अशातच येथे होणारी गर्दी लक्षात घेता, शासनाने एक अधिकृत इमारत बांधून त्यात मंडई चालू करण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी घेतला.

त्याच अनुषंगाने कर भरणाऱ्यांचे पैसे खर्च करून इमारत बांधण्यात आली. तीचे नामकरण लोकनेते गोपीनाथ मुंडे बहुउद्देशीय हॉल व श्रीमती सुमनताई रामचंद्र माथवड भाजी मार्केट असे करण्यात आले. परंतु अनेक वर्ष उलटूनही ही इमारत तीचा उद्देश सध्या करण्याच्या प्रतीक्षेत आहे.त्यामुळे कोट्यावधी रुपये पाण्यात गेल्याची भावना आहे.या वेळी गिरीश गुरनानी यांनी भाजी मंडई त्वरित चालू चालू न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
या वेळी पुणे शहर आयुक्त नवल किशोर राम यांनी आश्वासन दिले आहे कि, कोथरूडची भाजी मंडई त्वरित चालू करण्यासाठी महापालिकाच्या वतीने तातडीने पाऊल टाकले जातील.