महाराष्ट्रराजकीय

पवार साहेबांना धमकी देणाऱ्याने दम असेल तर प्रत्यक्ष समोर यावे दीपक मानकर यांचा इशारा

पुणे : या महाराष्ट्रात पहिला माणूस आहे. जो साहेबांना धमकी देतोय.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकी देणाऱ्यामध्ये खरेच दम असेल तर त्यांनी प्रत्यक्ष समोर यावे आणि पवार साहेबांना धमकी दिली असल्याचे सांगावे.आमच्यासारखे कार्यकर्ते साहेबांसाठी काही करु शकतात. त्यांना योग्य पद्धतीने दाखवून देण्यात येईल.असा इशारा राष्ट्रवादीचे नेते दीपक मानकर यांनी दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. एका सोशल मीडिया अकाऊंटवरून शरद पवारांना ही धमकी देण्यात आली असून “तुमचाही दाभोलकर होणार”, अशी पोस्ट या अकाऊंटवर करण्यात आली आहे. तसेच, या धमकीबरोबरच शरद पवारांना अश्लाघ्य भाषेत शिवीगाळही करण्यात आली आहे. यासंदर्भात गृहविभागानं लक्ष घालण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

मानकर म्हणाले, अशा पद्धतीने महाराष्ट्रातील वातावरण गढूळ करण्याचा हा प्रयत्न आहे. आज आमच्या नेत्या सुप्रिया सुळे मुंबईच्या पोलीस आयुक्तांना भेटायला गेल्या आहेत. सुप्रिया ताई तुम्ही काही काळजी करू नका. अशी लपून छपून धमकी देणारे याच्या सारखे आपण खूप बघितले आहे आणि त्याला उत्तर देण्याची क्षमता या कार्यकर्त्यांमध्ये आहे.

Img 20220425 wa001080841499313169957854513307260893077682

काही लोक औरंगजेबाची तुलना पवार साहेबांची करतात. पवार साहेबांनी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये छत्रपतींचा वारसा जपलेला आहे त्याची जपणूक करण्याचे काम या जाणत्या राजाने आपल्या आयुष्यामध्ये काम केले आहे. काडीचेही काम न केले नाही अशी माणसे साहेबा बद्दल बोलायला लागली की त्याबद्दल उत्तरे दिले जाईल.

चुकीचे वक्तव्य केले जाते.त्याला काहीतरी वेगळे प्रसिद्धी मिळू शकते अस आता वातावरण राहिले नाही आणि मीडियाने या लोकांची दखल अजिबात नाही  घेतली पाहिजे. काही तरी बोलायचं मूर्खासारखे आपण वेगळे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करायचा यांना महाराष्ट्राची जनता कधीही भीक घालणार नाही. 

Fb img 16837376233493064729888638918603

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये