पुणे शहर

अनाथ मुले, दिव्यांग विद्यार्थी, वृद्धाश्रमातील जेष्ठ यांच्यासाठी पावनखिंड चित्रपटाच्या मोफत शोचे आयोजन..

मुकेश प्रतिष्ठानच्या वतीने उपक्रमाचे आयोजन..

पुणे : अनाथ व निराधार मुले, कामगारांची मुले, दिव्यांग विद्यार्थी, वृद्धाश्रम ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी मुकेश प्रतिष्ठानच्या वतीने बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाचा इतिहास दाखवणाऱ्या  पावनखिंड या मराठी चित्रपटाच्या मोफत शोचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी माजी विधी समिती अध्यक्ष दत्ता बहिरट तसेच पावनखिंड चित्रपटातील कलाकार अक्षय वाघमारे, शुश्रूत मंकणी, तसेच रस्त्यावर भटकी कुत्री व मांजर यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया व उपचार करणारे आदित्य व प्रिया मकारिया, आकाश व नेहा पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र पवार यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते.

जनसेवा फाऊंडेशन वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक, देहू येथील पंचमदेव संस्थेचे विद्यार्थी, रस्त्यावर भिक्षुकी मागून उदरनिर्वाह करणारे पोतराज समाजाचे लहान मुले मुली , बांधकाम कामगार मुले, जनसेवा फाऊंडेशनचे अनाथ निराधार मुले व मुली, व उमेद फाऊंडेशनचे दिव्यांग विद्यार्थी यांना हा चित्रपट दाखवण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतिदिनी व स्वामी समर्थ महाराज जयंती असा दुर्मिळ योग साधत हा उपक्रम राबवण्यात आला.  मंगला मल्टिप्लेक्स चित्रपटगृहात या खास शोचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व मुलांनी जय भवानी जय शिवाजी च्या नामघोषाने सर्व थिएटर दणादून सोडले. मुलांसाठी खाऊ तसेच थंड पेयाची  व्यवस्था करण्यात आली होती.

या उपक्रमानंतर  स्व रामदासजी पवार(दादांची)पुण्यतिथी म्हणून सर्व वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना  साऊथ इंडियन मेजवानीचे नियोजन करण्यात आले होते.

Fb img 1648963058213

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये