पुणे शहर, जिल्हा

ज्या भूमीत आपण जन्मलो त्या मातीच देणं लागतो याच भावनेतून दिवाळी फराळ साहित्य वाटपाचा उपक्रम.. किरण दगडे पाटील

किरण दगडे पाटील यांच्या माध्यमातून भोर वेल्हा मुळशी परिसरातील ६६ हजार कुटुंबांची दिवाळी गोड

मुळशी : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे भोर विधानसभा, निवडणुक प्रमुख, माजी नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्या माध्यमातून नागरिकांची दिवाळी गोड व्हावी यासाठी मोठ्या उत्साहात सुरू दिवाळी फराळ साहित्य वाटप कार्यक्रमाचा सुरू आहेत. आतापर्यंत भोर, वेल्हा, मुळशी परिसरातील ६६ हजार कुटुंबांना दिवाळी फराळ साहित्य वाटप करून त्यांची दिवाळी गोड करण्यात आली आहे.

भोर विधानसभा मतदार संघात ठिकठिकाणी होत असलेल्या या कार्यक्रमांना नागरिक मोठ्या संख्येने प्रतिसाद देत आहेत.
आतापर्यंत या उपक्रमात पहिल्या दिवशी भोर शहर व परिसरात २० हजार कुटुंबांना, दुसऱ्या दिवशी राजगड(वेल्हे)तालुका परिसरात १० हजार कुटुंबांना,  तिसऱ्या दिवशी भोर तालुक्यातील हायवे लगतच्या गावांमध्ये १० हजार कुटुंबांना, चौथ्या दिवशी मुळशी तालुक्यातील घोटावडे फाटा येथे २० हजार कुटुंबांना तर पाचव्या दिवशी हिंजवडी माण परिसरात ६ हजार कुटुंबांना दिवाळी फराळ साहित्याचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमाला प्रचंड गर्दी होत असताना  शिस्तबध्द पद्धतीने कुठलाही गोंधळ नाही, गैरप्रकार नाही फक्त सेवाभाव वृत्तीतून पार पडणाऱ्या या उपक्रमावर नागरिकांनी मोठा विश्वास दाखवला आहे. त्यामुळे  हे कार्यक्रम यशस्वीपणे पार पडत असून भोर वेल्हा मुळशी परिसरातील हजारो नागरिकांना दिवाळी फराळ साहित्य वाटप करून त्यांची दिवाळी गोड करण्यासाठी हातभार लावण्यात आला आहे.

किरण दगडे पाटील म्हणाले, माझ्यावर प्रेम करणाऱ्या नागरिकांची दिवाळी देखील गोड व्हावी यासाठी मी गेल्या नऊ वर्षांपासून प्रयत्नशील आहे. ह्या वर्षी या कार्यक्रमाचं नियोजन भव्य स्वरूपात केलं आहे. कार्यक्रम कुठलाही असो मी हाक दिली की लोक विश्वास ठेऊन उपस्थित राहतात. ज्या भूमीत आपण जन्मलो त्या मातीच देणं आपण लागतो याच भावनेतून हे सर्व उपक्रम सुरू आहेत.

Fb img 17288897182749087862465866374084
भोर मधील कार्यक्रमात ज्येष्ठांनी किरण दगडे पाटील यांना दिला आशीर्वाद
Fb img 17288897377353289856847438517963
भोर शहर परिसरात कार्यक्रमाला झालेले गर्दी
Img 20241013 wa00211189259812719706251
Img 20241013 wa00245500937520932456456
मुळशी घोटावडे फाटा येथील कार्यक्रम
Img 20241014 wa00157978834318641976096
Fb img 17288910962485152670226682959264
हिंजवडी माण येथील कार्यक्रमात किरण दगडे पाटील यांचे महिलांनी केले उत्स्फूर्त स्वागत..
Fb img 17288912631921768892640557809506
Fb img 17288912402633508014802364979100 1
भोर हायवे परिसातील गावांसाठी घेतलेल्या कार्यक्रमाला भर पावसात नागरिकांचा उदंड प्रतिसाद
Fb img 1728891444329820119472426778915
Fb img 17288914769724711554245087201214
राजगड (वेल्हा) तालुक्यातील कार्यक्रमाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद
Img 20240404 wa0016281291197243699799508498
Img 20241011 wa00155017687067140315753
Img 20240404 wa0012281298841886320058264868
Img 20240404 wa0013281291032765212350995267

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये