पुणे शहर

भाजपा पुणे जिल्हा नवीन कार्यकारणीतील पदाधिकार्यांची नियुक्ती.

भाजपा पुणे जिल्हा नवीन कार्यकारणीतील पदाधिकार्‍यांची नियुक्ती.
पुणे : भाजपा पुणे जिल्ह्याच्या वतीने नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.याबरोबरच नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे,पुणे जिल्हा प्रभारी योगेश गोगावले,पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे,खासदार गिरीश बापट,माजी राज्यमंत्री बाळा भेगडे,आमदार भीमराव तापकीर,शरद ढमाले,कांचन कुल आदी मान्यवरांच्या उपस्थित निवड जाहीर करण्यात आली.
या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना गोगावले म्हणाले २०१४ साली सत्तेत आलेले मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकार २०१९ साली  संघटनेची पायाभूत संरचना व २०१४ पासून केलेल्या विकासकामांच्या जोरावर पुन्हा एकदा सत्तेत आले.उज्वला गॅस योजना,सुरक्षा विमा योजना या अधिक लोकप्रिय ठरल्या.करोडो नागरिकांनी या योजनांचा लाभ घेतला.
पदाधिकारी निवडीत मला रस नाही पदाधिकारी कोणीही असो त्याने पक्षाच्या शिस्तीत व विचारधारेला अनुसरून काम केले पाहिजे.कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सत्तेत असूनही इतर पक्षांची वाताहत झाली परंतु भाजपाचा कार्यकर्ता हा प्रशिक्षित असल्यामुळे अधिक सक्षमपणे या संकटात काम करु शकला.आगामी काळात कोणालाही उमेदवारी देताना तो कार्यकर्ता प्रशिक्षित आहे की नाही हे देखील तपासले जाईल.पुणे जिल्हा ही कुठल्याही घराण्याची मक्तेदारी नसून आगामी काळात भाजपाचा जिल्हा अशी ओळख झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
उपस्थित पदाधिकाऱ्यांना खा.गिरीश बापट यांनी समारोपीय मार्गदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये