महाराष्ट्र होणार का मास्कमुक्त? काय म्हणाले अजित पवार

मुंबई: महाराष्ट्र मास्कमुक्त करण्याचा निर्णय घेणार असल्याची चर्चा सुरू आहे. अजित दादा म्हणतात की कॅबिनेट मध्ये महाराष्ट्र मास्कमुक्त करण्याची कोणतीही चर्चा नाही पण दुसरीकडे हसन मुश्रीफ म्हणतात की चर्चा झाली!
गेल्या दोन वर्षा पासून कोरोना महामारी सोबतच्या लढाईमध्ये लस घेण्यासोबत मास्क वापरण ही तेवढच महत्त्वाचं होत. सध्या महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट ओसरताना दिसत आहे. पण आता मास्क लावायचा का नाही अशी चर्चा मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाल्याची माहिती होती.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यात मंत्रिमंडळाची बैठक पार पाडली. बैठकी नंतर उपमुख्मंत्री अजित पवारांनी हे वृत्त्त खोटं असल्याचं म्हटलं आहे.अजित पवार म्हणाले की कोरोनाच्या काळात असा निर्णय बाहेरच्या देशात घेतला असेल, तो निर्णय त्यांनाच लख लाभ. पण आपल्या राज्यात तश्या प्रकारची चर्चा पण नाही आणि निर्णय पण घ्यायचा नाही.
कृपया अशा बातम्या दाखवून लोकांमध्ये गैसमज करू नये असं माझा त्यांना स्पष्ट सांगणं आहे. दुसरीकडे हसन मुश्रीफ यांनी असा दावा केला की आपल्या राज्या पण जर संख्या कमी झाली तर मास्कमुक्ती बाबत निर्णय घ्यावा की नाही अशी फक्त चर्चा झाली आहे, पण अजून कोणताही निर्णय घेतला नाही. दोन मंत्र्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यामुळे संभ्रम होत आहे.







