पुणे शहर

माझ्या कामाची दखल घेऊन नागरिक माझ्या पाठीशी उभे राहतील ; भीमराव तापकीर यांनी व्यक्त केला विश्वास

पुणे : खडकवासला मतदारसंघातील महायुती भाजपचे उमेदवार भीमराव तापकीर यांच्या पदयात्रेला  गोकुळनगर, नऱ्हे येथे गणपती बाप्पाच्या आरतीने सुरुवात झाली. या पदयात्रेत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पदयात्रेत महिलांचा, ज्येष्ठ नागरिकांचा आणि युवकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग हा विशेष ठरला.  पदयात्रे दरम्यान नागरिकांनी भीमराव तापकीर यांना सलग चौथ्या विजयाच्या शुभेच्छा दिल्या.

गेल्या दोन दिवसांपासून खडकवासला मतदारसंघातील विविध भागांत आमदार भीमराव तापकीर यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा होत असून, नागरिकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. महायुतीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एक दिलाने प्रचारात सहभागी होत असल्याचे चित्र आहे.

Img 20241020 wa0001435697684176070576

आमदार तापकीर म्हणाले, माझ्या  कार्यकाळात अनेक महत्त्वाचे विकास प्रकल्प राबविण्यात आले. हे प्रकल्प केवळ कागदावर नसून प्रत्यक्षात सुरू असून, त्याचा फायदा मतदारसंघातील सर्व स्तरांतील लोकांना होत आहे.  खडकवासला मतदारसंघातील प्रत्येक मतदाराचे एक मत हे माझ्यासाठी सर्वोच्च महत्त्वाचे आहे. नागरिक माझ्या कामाची दखल घेऊन मला पुनश्च संधी देण्यासाठी उत्सुक आहेत, याचा मला विश्वास आहे.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री सत्यवान भूमकर, खडकवासला मतदारसंघ भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष आणि माजी उपसरपंच सागर भूमकर, माजी उपसरपंच सुशांत कुटे,  सोमनाथ कुटे, दिलीप नवले, आनंद दांगट, कोमल कुटे तसेच भाजप-महायुती मित्र पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते, आणि मोठ्या संख्येने नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला.

Img 20240404 wa0016281297658999536660438617
Img 20240404 wa0013281298602993728148316202

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये