प्रतीक्षा संपली! बारावीचा निकाल उद्या; दुपारी एक वाजता ऑनलाईन होणार जाहीर

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अशातच महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल उद्या जाहीर करण्यात येणार आहे. बोर्डाकडून थोड्याच वेळात अधिकृतपणे निकालाबाबत माहिती दिली जाणार आहे.
दुपारी एक वाजता बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आला. गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे परीक्षा झाल्या नव्हत्या. पण यंदा मात्र कोरोना आटोक्यात असल्यानं दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या. आता मात्र विद्यार्थी आणि पालकांना निकालाची प्रतिक्षा आहे.बारावी बोर्डाच्या परीक्षा 4 मार्चपासून सुरु झाल्या आणि 7 एप्रिल रोजी संपल्या होत्या. तर राज्यातील 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. अखेर या सर्वांची प्रतीक्षा संपली असून उद्या निकाल जाहीर केला जाणार आहे.

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेचे निकाल जाहीर होतात.दरम्यान, महाराष्ट्र बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल कोणत्या दिवशी जाहीर होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. उद्या बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे लवकरच दहावीच्या निकालाची तारीखही जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.



