पुणे शहर

पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमाची प्रतीक्षा, पुणे लोकसभेची पोटनिवडणूक होणार की नाही?

पुणे लोकसभेची पोटनिवडणूक होणार की नाही ? याबाबत अजून स्पष्टता नाही. एकीकडे जिल्हा प्रशासनाकडून मतदान केंद्रांची सज्जता, मतदार याद्या अद्ययावत करणे अशी कामे सुरु आहेत. त्याचबरोबर पुण्यात कर्नाटकहून मतदान यंत्रे देखील दाखल झाली आहेत. सर्वसाधारण निवडणुकीच्या तयारीचाही भाग म्हणून याकडे पाहिलं जात आहे. तर दुसरीकडे जसा मे महिना संपत येत आहे तशी पोटनिवडणुकीची शक्यता मावळत चालली आहे. कारण पावसाळ्यात निवडणूक घेण्यास निवडणूक आयोग तयार नसतो आणि पावसाळ्यानंतर सर्वसाधारण निवडणुकीची वेळ जवळ येईल. त्यामुळे पुणे लोकसभेची पोटनिवडणूक होणार की नाही हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

खासदार गिरीश बापट यांचे 29 मार्च रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. लोकप्रतिनिधी कायद्यातील 151 (ए) अन्वये लोकसभा अथवा विधानसभेची जागा कोणत्याही कारणाने रिक्त झाल्यास सहा महिन्यांच्या कालावधीत ही जागा भरण्याकरता पोटनिवडणूक घेण्याची तरतूद आहे. परंतु मे महिना संपत आला तरीही पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही.

Img 20230524 wa0032

पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून पाच नावं चर्चेत आहेत. गिरीश बापट यांची सून स्वरदा बापट, संजय काकडे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक आणि कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची नावं चर्चेत आहेत. या पाच जणांपैकी भाजप एकाला उमेदवार म्हणून संधी देण्याची शक्यता आहे. या पाचही जणांनी पुण्याच्या विकासासाठी अनेक नवीन प्रोजक्ट्स हाती घेतले आहेत. शिवाय त्यांनी पुण्यातील इतर विषयांवरदेखील केंद्रीय स्तरावर नाव कमावलं आहे. त्यामुळे यापैकी भाजप नेमकी कोणाला संधी देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Img 20220425 wa0010282295345156635031542582

दुसरीकडे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये देखील ही जागा लढवण्यावरुन तू तू मैं मैं पाहायला मिळत आहे. वर्षानुवर्ष कॉंग्रेसकडून लढवण्यावरुन येणारी ही जागा आम्हीच लढवणार असं कॉंग्रेस नेते म्हणत आहे. तर पुणे शहरात आमची ताकद वाढल्याने ही आम्हाला मिळायला हवी, असा दावा राष्ट्रवादीचे नेते करताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कडून दीपक मानकर, प्रशांत जगताप तर काँगेस कडून मोहन जोशी, अरविंद शिंदे, रविंद्र धंगेकर या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे.

Img 20230511 wa00027384472977045778543
Img 20230524 wa0027

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये