शिक्षक एक दुर्लक्षित कोरोना योद्धा..

निवडणूक आली लावा शिक्षकांना कामाला. जनगणना…..आहेतच शिक्षक…. कारोना काळातही शिक्षकांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचे काम केले.
आज दोन वर्ष होत आली कोरोना संसंर्ग काळाला.
प्रत्येक घरातील लहान मुले विद्यार्थी घरातूनच शिक्षण घेत आहेत. कधी पर्यंत हा संसंर्ग आजार राहणार हे एक वैद्यकीय विषयातील तज्ज्ञ म्हणून मला सुद्धा सांगता येणार नाही. त्या बाबतीत जागतिक आरोग्य संस्था सुद्धा काही बोलायला तयार नाही. कारण ह्याची व्याप्ती अजूनही फारशी लक्षात येत नाहीये.
कदाचित येणाऱ्या शैक्षणिक वर्षांत देखील शालेय शिक्षण हे ऑनलाईन पद्धतीनेच होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. जर काही भागात संसंर्ग प्रमाण कमी झाला, रुग्ण संख्या कमी झाली तर कदाचित शाळा परत सुरू होतील, परंतू रुग्ण संख्या वाढली तर परत शाळा बंद होण्याची भीती.
आज कोरोना योद्धा म्हणून माझा व माझ्या सारख्या बर्याच वैद्यकीय विषयातील तज्ज्ञांचा सत्कार झाला.
पण मी एक वैद्यकीय विषयातील तज्ज्ञ तर आहेच पण मी एका मुलाचा पालक वडील आहे. गेले दोन वर्ष होत आली. मुलाची शाळा ऑनलाईन पद्धतीनेच सुरू आहे.
शाळेतील शिक्षक नक्कीच हुशार आहेत. काही गणितात तर काही इतिहास तर काही भूगोल तर काही इंग्लिश मध्ये तज्ज्ञ आहेत पण संगणक ह्या विषया बाबतीत ते फारसे तज्ज्ञ नव्हते.
काही तरूण वयातील शिक्षक होते ते नक्कीच ह्या ऑनलाईन शिक्षण देण्याच्या प्रयत्नात लवकर यशस्वी झाले पण काही बरेच शिक्षक जे मध्यम वयातील चाळीस पन्नास वयातील होते. जे शाळेतील फळा वर मास्टर होते. अख्खे पुस्तक तोंडपाठ असणारे होते त्या वयातील शिक्षकांना मात्र हे ऑनलाईन शिकवणे नक्कीच अवघड गेले. असणार….PPT / PDF Slide Share..
ZOOM meet….Google meet…
तसे किचकटच होते.
ऑनलाईन शिक्षण प्रणाली तशी भारतात फारशी विकसित नव्हती पण ह्या कोरोना योद्धांनी खूप लवकर ही ऑनलाईन पद्धती स्विकारली. काही वयस्कर शिक्षक मला आठवते मला दवाखान्यात येऊन भेटतात, डाॅक्टर घरात बसून लॅपटॉप समोर बसून संगणका समोर बसून तासनतास PPT/ PDF तयार करण्यात वेळ जातो.
शाळेत विद्यार्थसमोर वर्गात फळा शिकवणे खूप सोपे हे ऑनलाईन अवघड काम आहे. परंतू ह्या शिक्षक वृदांनी ह्यावर विजय मिळवून खूप छान पद्धतीने ऑनलाईन शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. ऑनलाईन शिक्षण,ऑनलाईन परिक्षा, पेपर, तरूण वयातील शिक्षक असोत की वयस्कर शहरातील असो की ग्रामीण भागातील तांडा पाड्यावरील शिक्षक असो खूप छान काम आजही हे शिक्षक करत आहेत.. खरच मानाचा सलाम मुजरा.. यांना करायलाच पाहिजे.
मी अथवा माझे वैद्यकीय विषयातील तज्ज्ञ दवाखान्यात काम करत कोरोना रुग्णांची सेवा देत आहोत पण हे शिक्षक मुलांना ह्याच काळात शिक्षण देण्याचे पुण्यकर्म करत आहेत. येणारी पिढी साक्षर बनावी, सुसंस्कृत बनावी म्हणून कष्ट घेत आहेत. खरंच हे शिक्षक पण कोरोना योद्धाच आहेत. कोरोना काळात पण ह्या शिक्षक वर्गाने डाॅक्टरांसोबत काम केले आहे. डाटा एन्ट्री, लसीकरणसाठी जनजागरण असेल, कंट्रोल रूम, वाॅररूम मध्ये काम असेल त्यांच्या कार्यास सलाम.
लवकरात लवकर हा आजार संपून जावा आणि परत शाळेची घंटी वाजावी आणि हे ज्ञानार्जनचे काम ऑफलाईन शाळेतील वर्गात सुरू होईल अशी अपेक्षा बाळगूयात.
सरकार पातळीवर सामाजिक पातळीवर आज पाहीजेल तसा मान शिक्षक वृदांना ह्या कोरोना काळात मिळालेला नाही पण ते एक योद्धा आहेतच हे मान्य केलेच पाहीजे…
डाॅ.सचिन नागापूरकर
अस्थीरोग व कृत्रिम सांधेरोपण तज्ञ
पुणे



