पुणे शहर

बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या युवासेना पदाधिकारी संवाद; पुण्यातील नव्या पदाधिकाऱ्यांची निवड

पुणे : बाळासाहेबांची शिवसेनेच्या युवासेनेतर्फे आज डेक्कन येथील आपटे सभागृह येथे , पदाधिकारी संवादाचे आयोजन युवासेना राज्य सचिव किरण साळी यांचेकडुन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री शिवसेना उपनेते उदय सामंत यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

यावेळी युवा सेनेची पुणे शहर प्रमुख पदी निलेश गिरमे ,जिल्हाप्रमुख पदी निलेश घारे  सावित्रीबाई बाई फुले पुणे विद्यापीठ कक्ष अध्यक्ष पदी आकाश शिंदे , युवतीसेनेच्या विस्तारक शर्वरी गावंडे , तसेच उपशहर प्रमुख ,शहर समन्वयक , चिटणीस ,विभागप्रमुख शहर व जिल्हा कार्यकारणी राज्याचे उद्योगमंत्री शिवसेना उपनेते उदय सामंत यांच्या हस्ते जाहीर करण्यात आली व त्यांना नियुक्ति पत्र देण्यात आले.

Img 20221021 wa00011331728156984263886

येणाऱ्या काळात युवा सेनेने कशा प्रकारे काम केले पाहिजे, युवकांच्या समस्या जाणून त्या दूर करण्यासाठी कसे झटले पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले. युवाशक्ती ही देशाची ताकद आहे ती मजबूत असेल तर देश प्रगती करतो. त्यामुळे नेतृत्वगुण, निर्णयक्षमता यावर भर दिला पाहिजे. आपण शांत आहोत पण हतबल नाही हे दाखवून देण्यासाठी ताकदीने, जोमाने काम करा. आपली लढाई ही हिंदुत्वाची आहे. बाळासाहेब आणि  दिघे साहेबांचे विचार आपल्याला पुढे न्यायचे आहेत, त्यामुळे विकासकामे सर्वांपर्यंत पोहोचवा, असे त्यांनी सांगितले.

Img 20221019 143448 4921652329476299347948

वेदान्त फॉक्सकॉन प्रकल्पावर बरीच उलटसुलट चर्चा झाली. तो कोणाच्या चुकीने गेला हे मी याआधीच सांगितले आहे. पण आपल्या सरकारच्या माध्यमातून अधिक रोजगार देणारा प्रकल्प लवकरच आणू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तसेच मुख्यमंत्री रोजगार योजनेच्या माध्यमातून युवक युवतींना दहा लाखांपर्यंतचे कर्ज मिळते. याच धर्तीवर पुण्यात लवकरच एक शिबीर घेऊन १५०० उद्योजक घडवण्याचा  त्यांचा मानस आहे.

Img 20221020 wa0232

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे. आपल्या  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत आणि वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना नक्कीच यशस्वीपणे काम करेल हा विश्वास आहे. यावेळी शहरप्रमुख नाना भानगिरे, पुणे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अजय भोसले, जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, आणि युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Screenshot 2022 10 19 10 52 53 83
Img 20221020 wa00071429831687423321840
Img 20221012 192956 045

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये