पुणे शहर

पुणे महापालिकेच्या ‘निर्माल्य टू निसर्ग’ अभिनव उपक्रमाला सुरुवात!

पुणे : निर्माल्यातून निसर्गाकडे जाण्यासाठी व पुण्याचा गणेशोत्सवाच्या पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी पुणे महानगरपालिका, स्वच्छ संस्था आणि कमिन्स इंडिया  यंदाही एकत्र आले आहेत. उत्सवाचे पावित्र्य व निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी निसर्ग टू निसर्ग या उपक्रमास सुरूवात करण्यात आली आहे.

पुणेकरांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी होत संस्कृती सोबत पुण्याचा निसर्ग देखील जपण्यासाठी पुढाकार घेतला. आपणही पुण्याच्या लाडक्या गणेशोत्सवाचे वेगळेपण जपण्यासाठी, पुण्याची पर्यावरण पूरक संस्कृती जपण्यासाठी आपल्या बाप्पाला वाहिलेली फुले, हार, दुर्वा इ. सारखे निर्माल्य येत्या १५ व २० सप्टेंबर रोजी आपल्या दारी येणाऱ्या स्वच्छ संस्थेच्या कचरा वेचकांकडे वेगळे द्या. कचरा वेचक ते गोळा करून महानगरपालिकेच्या गाडयांना देतील व तिथून पुढे ते नैसर्गिक रित्या जिरवले जाईल. 

Img 20210913 wa0011 1

निर्माल्यामध्ये घेतल्या जाणाऱ्या वस्तू हार, पाने, फुले, दुर्वा
निर्माल्यामध्ये न घेतल्या जाणाऱ्या वस्तू,प्लास्टिक, थर्माकोल, कापडी वस्तू किंवा तसबिरी, मुर्त्या किंवा त्यांचे अवशेष तसेच कुठलेही खाद्यपदार्थ निर्माल्य गोळा करण्याच्या तारखा : १५ व २० सप्टेंबर २०२१ चला, निर्माल्याकडून निसर्गाकडे वाटचाल करूयात. असे आवाहन पुणे महापालिकेने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये