राजकीय

मुंबईकरांना अमृता फडणवीसांच्या वक्तव्यावर हसावं की रडावं हा प्रश्न – महापौर किशोरी पेडणेकर

मुंबई : भाजपाने आयोजित केलेल्या कॅन्सर (cancer) मुक्त अभियानाचा आज अमृता फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ झाला. या कार्यक्रमापूर्वी प्रसार माध्यमांशी बोलताना अमृता फडणवीसांनी मुंबईकरांच्या या समस्येबद्दल बोलताना traffic जाम आणि घटस्फोटाचा नात जोडलं आहे. मुंबई मध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडी मुळे अनेक जोडप्यांमध्ये घटस्फोट होतात असा अमृता फडणवीसांचा दावा आहे . याच प्रकरणी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या अमृता फडणवीसांनी एक नवीन जावई शोध लावला आहे. की ३% घटस्फोट हा वाहतुकीच्या कोंडी मुळे होतात, याच्यावर आता हसावं की रडाव हा मुंबईकरांना पण प्रश्न पडलाय ,

पेडणेकर म्हणाल्या, करमणुकीचे कार्यक्रम बघण्यापेक्षा भारतीय जनता पार्टीच्या स्त्रियांपासून अगदी उच्चशिक्षितांच्या सगळ्यांचे ते भाषण ऐकत आहेत. सगळे जावई शोध यांनीच लावले आहेत. १००% मुंबईचे रस्ते हे अगदी गुळगुळीतच आहे असा आम्ही कधीही दावा केला नाही. पण जिथे जिथे आम्हाला खड्डे दिसले तिथे तिथे त्या वेळी ते खड्डे भरून कार्यक्रम पूर्ण केला आहे. आणि या पुढे ही करत राहणार आहेत. मुंबईला नियमितच अगदी आंतरराष्ट्रीय पातळी वर बदनाम करायचे काम भारतीय जनता पार्टी करत आहे .

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये