पुणे शहर

वारजेत जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील १०१ महिलांचा सन्मान..

पुणे : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वारजे माळवाडी परिसरातील धैर्य , सामर्थ्य आणि कर्तुत्वाचे जोरावर आपले कार्याचा ठसा उमटवून कुटुंब , समाज तसेच राष्ट्र उभारणीत अमूल्य योगदान देणाऱ्या १०१ महिलांचा सन्मान पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन करण्यात आला .
भाजप सहकार आघाडी पुणे शहर अध्यक्ष सचिन दशरथ दांगट यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .

आदित्य गार्डन सिटी मधील घरेलू कामगार महिला , वारजे माळवाडी पोलीस स्टेशन मधील महिला पोलीस कर्मचारी , वारजे वाहतूक विभागातील महिला पोलीस कर्मचारी , पुणे मनपा उद्यान विभागातील माळी काम करणाऱ्या महिला भगिनी , संपूर्ण वारजे माळवाडी परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी असणाऱ्या पुणे मनपाच्या महिला स्वच्छता कर्मचारी , पेट्रोल पंपावर जनसेवा करणाऱ्या महिला कर्मचारी तसेच विविध सोसायटीतील ज्येष्ठ महिला भगिनींचा महिला दिनाच्या निमित्ताने सन्मान करण्यात आला .

या कार्यक्रम प्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडू हाके ,वारजे एपीआय वारजे वाहतुक विभाग विशाल पवार , आकांक्षा नारी मंच पुणे शहर अध्यक्षा मनीषा सचिन दांगट , मनीषा ढोले , सुभाष आगरवाल , अरूणा जोशी , कुसुम पन्हाळे , विद्या बर्गे , मंगल मानकर , व्यंकटेश दांगट , अमजद अन्सारी यांच्यासह महिला बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Img 20230308 wa0000

सालाबादप्रमाणे राबविल्या जाणाऱ्या या छोटेखानी कार्यक्रमाचे सर्व महिला भगिनींनी विशेष कौतुक केले . या कार्यक्रमाचे आयोजन भाजप सहकार आघाडी पुणे शहर अध्यक्ष सचिन दशरथ दांगट यांनी केले होते .

Img 20221126 wa02126927299965323449855

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये