पुणे शहर

चौथी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत शालेय साहित्य;  माजी नगरसेवक सनी निम्हण यांच्यातर्फे उपक्रम

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक सनी निम्हण यांच्यातर्फे उपक्रम

पुणे : माजी नगरसेवक सनी निम्हण यांच्या वतीने ‘सोमेश्वर फाउंडेशन’च्या माध्यमातून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘सेवा सप्ताह’ निमित्त चौथी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप करण्यात येणार आहे.

याबद्दल माहिती देताना माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी सांगितले की, “आमचे मार्गदर्शक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी सेवा सप्ताहाचे आयोजन केले जाते. त्याच निमित्ताने सामाजिक सेवा म्हणून औंध, पाषाण, सोमेश्वरवाडी आणि सुतारवाडी येथिल चौथी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. तरी विद्यार्थ्यांनी १० जून ते १७ जून पर्यंत ८३०८१२३५५५ या नंबरवर नाव नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Img 20220425 wa001080841499313169957854513307260893077682

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, “सनी विनायक निम्हण यांनी नेहमीच विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. रक्तदान शिबिर, पुणेआयडॉल, तसेच विविध सामाजिक कार्यक्रम राबवत समाजातील वेगवेगळ्या घटकांची सेवा कशा पद्धतीने करता येईल हे त्यांच्या उपक्रमाद्वारे साध्य केले जाते. यावेळी शालेय विद्यार्थ्यांसाठी शालोपयोगी साहित्य भेट देण्याचा उपक्रम ते राबवत आहे.

Img 20230609 wa00167466741753798967901
Img 20230610 wa00057237527746484988937
Img 20230610 wa00452049733278487094475
Fb img 16837376233493064729888638918603

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये