पुणे शहर

वसंत मोरे यांना हटवून साईनाथ बाबर मनसेचे शहर अध्यक्ष
राज ठाकरेंचा निर्णय

मुंबई : मनसेचे पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांना पदावरून हटविण्यात आलेअसून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने आज नगरसेवक साईनाथ संभाजी बाबर यांची पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अशी घोषणा मनसे च्या वतीने करण्यात आली आहे.

पुण्यातील मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी माझ्या प्रभागात स्पीकर लावणार नाही, ही ठाम आणि सर्वसमावेशक भूमिका घेतली. त्यांच्या भूमिकेचे एकीकडे स्वागत होत असले तरी पक्षांतर्गत मात्र विरोध होताना दिसत आहे. त्यांच्या भूमिकेनंतर आता वेगळीच चर्चा रंगू लागली आहे. राष्ट्रवादीत जाण्यासाठी वसंत मोरे तयारी करत असल्याची कुजबूज सुरू झाली आहे. या पार्श्वभुमीवर मनसेच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

Fb img 1648963058213

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये