पुणे शहर

VIDEO : पुण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील दुकानं, होर्डिंग्जला आग

पुणे : पुणे स्टेशन परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर असणारी दुकाने आणि होर्डिंग्जला आग लागल्याची घटना घडली आहे. गॅसची गळती झाल्याने ही आग लागल्याची माहिती मिळत आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवलं. पण यावेळी सर्व दुकानं जळून खाक झाली होती.

अग्निशमन विभागाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयतीच्या निमित्ताने पुणे स्टेशन येथील पुतळ्याच्या समोरील बाजूला काही स्टॉल लावण्यात आले आहेत. काही खाद्यपदार्थ तयार करण्याचं काम तीन वाजण्याच्या सुमारास सुरू होते. यावेळी गॅस गळती झाल्याने आग लागली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन काही मिनिटात आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आलं आहे.

Img 20220414 130128 501 1
Fb img 1648963058213
Img 20220414 wa0001

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये