पुणे शहर

पुण्यात संजय राऊत यांची जाहीर सभा ; जाहीर सभेतून काय बोलणार ? याबाबत उत्सुकता

पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील राजकारण तापले आहे. शिवसेना आणि भाजप या पूर्वीच्या मित्रपक्षांमध्ये टोकाचा संघर्ष पाहायला मिळत आहे. या पार्श्वभुमीवर शिवसेनेचे फायर ब्रॅन्ड नेते अशी ख्याती असलेले नेते खासदार संजय राऊत यांची पुणे शहरात जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत ते काय बोलतात ? कोणावर आसूड ओढणार ? कोणाकोणाचा आवाज बंद करणार ? याबाबत पुणेकरांमधे उत्साह आहे ?

पुण्यात शिवसेनेची जाहिर मेळावा सभा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार आहे. गुरूवारी 5 मे 2022 रोजी, सायं 5 वा  स्व. विठ्ठलराव तुपे नाट्यगृह रस्ता, माळवाडी हडपसर येथे या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांनी दिली आहे.

मोरे म्हणाले, गुरूवारी पुणे शहरात होणाऱ्या जाहीर मेळावा सभेची जय्यत तयारी सुरू आहे. या सभेला शिवसैनिकां सोबतच पुणेकर नागरिक मोठ्या संख्येने सभेला उपस्थित राहणार आहेत.

Img 20220425 wa00102978251768482543832

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये