पुणे शहर

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार..

डी पी रस्त्यावरून रुग्णालयाकडे येण्यासाठी नाल्यावर कलव्हर्ट बांधण्यास मान्यता

पुणे : गेली अनेक वर्षे माई मंगेशकर पथावरील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय परिसरातील कोंडी सुटावी आणि नागरिकांना कमीत कमी मनस्ताप व्हावा यासाठी भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर, रुग्णालय प्रशासन, पोलीस अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी सातत्याने प्रयत्नशील होते व विविध उपाययोजना देखील करत होते,मात्र त्या छोट्या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्यामुळे प्रश्न सुटत नव्हता. परंतु आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला डीपी रस्त्यावरून नाल्यावर कलव्हर्ट टाकून रुग्णालयापर्यंत रस्ता करण्यास पालिकेची परवानगी मिळाल्याने वाहतूक कोंडी सुटण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे संदीप खर्डेकर यांनी सांगितले.

हिमाली, संकुल यासारखे मोठे गृहप्रकल्प, सेवासदन शाळा ह्या सगळ्यामुळे मंगेशकर रुग्णालयासमोरील रस्त्यावर वाहतुकीवर ताण येत होता. नियमित होणाऱ्या वाहतूक कोंडी मुळे नागरिक त्रस्त झाले होते. रुग्णालय प्रशासनाने रस्त्यावर पार्किंग होऊ नये यासाठी विविध उपाययोजना केल्या आणि रुग्णालयाच्या आवारात प्रशस्त पार्किंग उपलब्ध केले, मात्र रुग्णांचे अनेक नातेवाईक रस्त्यावर पार्किंग करून घाईगडबडीत रुग्णालयात जात असल्याने त्याचाही वाहतुकीला अडथळा होत होता.

यासंदर्भात रुग्णालय प्रशासनासोबत दोन दिवसापूर्वी संदीप खर्डेकर यांची चर्चा झाली असता आम्ही डी पी रस्त्यावरील ( म्हात्रे पूल ते राजाराम पूल दरम्यान ) एक प्लॉट खरेदी केला असून तेथून रुग्णालयापर्यंत रस्ता करण्यास मान्यता मिळाली आहे, तसेच तेथील नाल्यावर कलव्हर्ट ( छोटा पूल ) बांधण्यास ही सर्व संबंधित खात्यांची परवानगी मिळाली असल्याचेही रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले. याबाबत मनपाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी ही यांस दुजोरा दिला आहे.

Img 20220425 wa00102978251768482543832

ह्या छोटेखानी पुलाच्या उभारणीचा सर्व खर्च दीनानाथ मंगेशकर रुग्णालय करणार असून त्याबद्दल लवकरच रुग्णालया प्रशासनाचा नागरिकांच्या वतीने सत्कार करणार असल्याचे खर्डेकर यांनी सांगितले. येत्या सहा महिन्यात ह्या पुलाची उभारणी पूर्ण होईल आणि रुग्णालयात येणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी प्रशस्त रस्ता होणार आहे.

Img 20220507 wa0003
Img 20220507 wa0001 1
Img 20220507 wa0000
Img 20220507 wa0004
Img 20220507 wa0002
Img 20220508 wa0124

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये