महाराष्ट्र
नाशिकमध्ये विचित्र अपघातात एसटी बस जळून खाक, तिघांचा मृत्यू तर अनेकजण जखमी

नाशिक : पुणे महामार्गावर शिंदे पळसे टोल नाक्यावर विचित्र अपघातात एसटी बसने दोन वाहनांना धडक दिली. अपघातानंतर एसटी बस पेट घेत जळून खाक झाली. कार चालक अचानक थांबल्याने दोन एसटी कारवर धडकल्याचे सांगण्यात येते आहे. त्यात दोन ते तीन बाईकमध्ये अडकल्या.अपघातानंतर बसने पेट (Bus Accident) घेतला. पेट घेतलेली एसटी राजगुरूनगर आगाराची असल्याचे समजते आहे.

अपघातात दोन ते तीन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून अपघात झाल्यानंतर काही क्षणातच एसटी बस आगीत भस्मसात झाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.






