महाराष्ट्र

नाशिकमध्ये विचित्र अपघातात एसटी बस जळून खाक, तिघांचा मृत्यू तर अनेकजण जखमी

नाशिक : पुणे महामार्गावर शिंदे पळसे टोल नाक्यावर विचित्र अपघातात एसटी बसने दोन वाहनांना धडक दिली. अपघातानंतर एसटी बस पेट घेत जळून खाक झाली. कार चालक अचानक थांबल्याने दोन एसटी कारवर धडकल्याचे सांगण्यात येते आहे. त्यात दोन ते तीन बाईकमध्ये अडकल्या.अपघातानंतर बसने पेट (Bus Accident)  घेतला. पेट घेतलेली एसटी राजगुरूनगर आगाराची असल्याचे समजते आहे. 

Image editor output image1790157776 1670488792805

अपघातात दोन ते तीन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून अपघात झाल्यानंतर काही क्षणातच एसटी बस आगीत भस्मसात झाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. 

Img 20221126 wa02123601048173337149659

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये