पुणे शहर

दुरुस्तीच्या कामासाठी गुरूवारी पाणी पुरवठा बंद राहणार

पुणे : दुरुस्तीच्या कामासाठी गुरूवारी पुण्यातील कोथरूड आणि शिवाजीनगर भागातील काही ठिकाणी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. गुरुवार दि. ०५/१/२०२३ रोजी कामगार पुतळा, शिवाजीनगर येथील पुणे मेट्रोचे कामांतर्गत पाण्याची मुख्य वितरण नलिका शिफ्ट करावी लागणार असल्याने तसेच चांदणी चौक येथे प्रथमेश सोसायटी लगत कोथरूड भागाला पाणी पुरवठा करणारी १६” इंची एम. एस. जलवाहिनी दुरुस्ती कामासाठी खालील भागातील पाणी पुरवठा बंद ठेवावा लागणार आहे. अशी माहिती पुणे महापालिका प्रशासनाने दिली आहे.

पाणीपुरवठा न होणारा भाग पुढीलप्रमाणे :
शिवाजीनगर येथील कामगार पुतळा परिसर, सिव्हीलकोर्ट, कपोते गल्ली, सिमला ऑफिस परिसर, मोदीबाग परिसर नरवीर तानाजी वाडी, पुणे-मुंबई रस्ता, वाकडेवाडी, पाटील इस्टेट इ.
कोथरूड भागातील शास्त्रीनगर, लोकमान्य कॉलनी, उजवी, डावीभुसारी कॉलनी, वेद भवन रोड वरील भाग, डुक्करखिंड हिलव्हिव सोसायटी वूड्स रॉयल सोसायटी, परमहंसनगर, चढावरचा भाग, लक्ष्मीनगर, राहुल टॉवर, मुठेश्वर कॉलनी, गुरुजन सोसायटी इ. तसेच वरील भागाचा पाणी पुरवठा दुसऱ्या दिवशी शुक्रवार दि. ०६/१/२०२३ रोजी उशिरा व कमी दाबाने होण्याची शक्यता आहे.

Img 20221228 wa0001281294303512961784024189

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये