पुणे शहर

वारजेत अखंड हरिनाम सप्ताहातील पारायणानाची सांगता..

लहानांपासून अबालवृद्धांपर्यंत सर्वांनी पारायण वाचनात घेतला सहभाग

वारजे : वारजे येथे श्री गणेश मंदिराच्या “२९ व्या वर्धापन दिनानिमित्ताने राजयोग प्रतिष्ठान व श्रीमंत राजयोग गणेश मित्र मंडळाच्या वतीने २२ एप्रिल पासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहातील पारायण वाचनाचा समारोप आज झाला. यावेळी पारायण वाचनात सहभागी झालेल्यांना बाबा धुमाळ यांच्या वतीने विठ्ठल रुक्मिणी प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली.

या अखंड हरिनाम सप्ताहात रोज सकाळी होणाऱ्या ज्ञानेश्वरी पारायण वाचनात लहान मुलांपासून अबालवृद्धांनी सहभाग घेते भक्ती भावाने पारायण वाचन केले. या पारायण वाचनात लहान मुलांचा सहभाग वाखणाण्या जोगा होता. १०० हून अधिक जण या पारायण वाचनात रोज सहभागी होत होते. या सर्वांना आज राजयोग प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाबा धुमाळ यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी ची प्रतिमा भेट देण्यात आली. सप्ताहाचे नेतृत्व ह.भ.प धर्मराज महाराज हांडे व ज्ञानेश्वरी पारायण नेतृत्व ज्ञानेश्वर पाटील व गुलाब सुर्यवंशी यांनी केले.

Screenshot 2023 0427 133512172213840565051751

२२ एप्रिल रोजी सुरू झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता उद्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे. आठ दिवस सुरू असलेल्या या अखंड हरिनाम सप्ताहा मुळे वारजे माळवाडी परिसराचे वातावरण भक्तीमय झाले आहे. अनेक नामवंत कीर्तनकार प्रवचनकार यांनी आठ दिवसात आपल्या कीर्तनातून व प्रवचनातून समाज प्रबोधनाचे काम केले. उद्या रविवार ३० एप्रिल रोजी सकाळी १० ते १२ ह.भ.प. संजयनाना धोंडगे महाराज (नाशिक) यांचे काल्याचे किर्तन होणार असून त्यानंतर महाप्रसाद असणार आहे.

Img 20221126 wa02126927299965323449855 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये