पुणे जिल्हा पुणे विद्यापीठ महाविद्यालयीन शिक्षकतेर कर्मचारी संघटनेच्या एम.आय.टी महाविद्यालयात शाखेच्या नाम फलकाचे अनावरण

पुणे: पुणे जिल्हा पुणे विद्यापीठ महाविद्यालयीन शिक्षकतेर कर्मचारी संघटना शाखेच्या नामफलकाचे अनावरण संघाचे सरचिटणीस डॉ आर.बी.सिंग यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी शाखा अध्यक्ष राजाभाऊ म्हाळुंगे यांनी मान्यवराचे स्वागत केले.
याप्रसंगी सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या वर होत असलेल्या अन्यायाची सविस्तर माहिती या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व मान्यवरांच्या समोर मांडली. विविध मागण्या मान्य होत नसल्याने कर्मचारी व्यथित झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. डॉ आर.बी.सिंग यांनी हा सर्व विषय समजून घेऊन कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार आणि सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन याप्रसंगी कर्मचाऱ्यांना दिले आणि संघटना आणखी बळकट करण्यासाठी आवाहन केले.
यावेळी संघाचे अध्यक्ष राजा बढे,शशिकांत कामठे,दिलीप गुरव अनिल उमरटकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बहुसंख्येने कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन, संजय भगत,नितीन चौधरी,निलेश सातपुते,तानाजी मोहोळ यांनी केले तर सुत्रसंचलन सुनील वडवेराव यांनी केले.



